फुकटात ‘हवा’; गुंडांचं ‘सोशल’ गँगवॉर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 11:12 PM2019-11-03T23:12:12+5:302019-11-03T23:12:16+5:30

संजय पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कºहाड : ‘दादा’, ‘भाई’, ‘डॉन’ म्हणवून घेणाऱ्यांची संख्या कºहाडात कमी नाही; पण आता ...

'Air' in free; Gangsters 'social' gangsters | फुकटात ‘हवा’; गुंडांचं ‘सोशल’ गँगवॉर

फुकटात ‘हवा’; गुंडांचं ‘सोशल’ गँगवॉर

Next

संजय पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : ‘दादा’, ‘भाई’, ‘डॉन’ म्हणवून घेणाऱ्यांची संख्या कºहाडात कमी नाही; पण आता हे ‘फॅड’ चक्क सोशल मीडियावर वाढलंय. चित्रविचित्र ‘स्लाईड शो’ तयार करून ते ‘इंटरनेट’वर ‘अपलोड’ करण्याची भलतीच ‘के्रझ’ सध्या निर्माण झालीय. हे सोशल गँगवॉर पोलिसांचीही डोकेदुखी बनल्याचे चित्र आहे.
कºहाडच्या चौकाचौकात पूर्वी डझनावारी फलक लागायचे. मोठ-मोठ्या फोटोत ‘गल्लीदादा’ झळकायचे; पण अशा फलकांवर पालिकेने अंकुश आणला. त्यामुळे ‘हवा’ निर्माण करू पाहणाऱ्यांची गोची झाली. त्यानंतर चौकात केक कापून वाढदिवस साजरा करण्याचं ‘फॅड’ निघालं. मध्यरात्री भररस्त्यात हुल्लडबाजी करीत तलवारीने केक कापण्याचा प्रकार अनेकांनी केला. त्याद्वारे ‘वट’ बसवायचा प्रयत्न असायचा. मात्र, अशा फाळकूट दादांना पोलिसांनी चाप लावला. रस्त्यावर वाढदिवस साजरे करणाºयांवर थेट गुन्हे दाखल केले. त्यामुळे हे भूतही अनेकांच्या मानगुटीवरून उतरले.
मध्यंतरी शहरात टोळीयुद्धाच्या घटना घडल्या. त्यामुळे पोलीस आक्रमक झाले. भल्याभल्या ‘दादा’, ‘भार्इं’ना पोलिसांनी तुरुंगाची हवा खायला लावली. तसेच गल्लीबोळात चुळबूळ करणाºयांवरही ‘वॉच’ ठेवला. त्यामुळे फक्त स्वत:चा ‘भाव’ वाढविण्यासाठी ‘कॉलर टाईट’ करणारांची पंचाईत झाली. ‘भाई’ म्हणवून घ्यायला कोणताच मार्ग सापडत नसताना काहींनी युवकांचे ग्रुप तयार करण्यास सुरुवात केली. या ग्रुपद्वारे शक्तिप्रदर्शन करण्याचा डावही आखला गेला. मात्र, पोलिसांनी काही टोळ्यांवर ‘मोक्का’चा फास आवळायला सुरुवात केली की, असे ‘ग्रुप’ही फुटायला लागले. युवक ग्रुपमधून बाहेर पडले. त्यामुळे ‘दादा’, ‘भाई’, ‘डॉन’ पुन्हा एकटे पडले.
कºहाड हे संवेदनशील शहर. येथे ठिणगीचा भडका कधी होईल, हे सांगणे कठीण. त्यामुळे गुंडगिरीला संधीच न देण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होतोय. मात्र, पोलिसांना चकवा देत काहींनी सध्या सवता सुभा मांडलाय.
कायद्याच्या कचाट्यात न सापडता भाईगिरी करण्याचा ते प्रयत्न करताना दिसून येतायत. त्यासाठी चित्रविचित्र फोटोंचे ‘स्लाईड शो’ तयार करून ते इंटरनेटवर ‘अपलोड’ केले जातायत. अशा ‘स्लाईड
शो’ना ‘कॅप्शन’ही तशीच भन्नाट
दिली जात असून, त्याद्वारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अनलाईक करना मना है!
सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडीओसोबत कॅप्शन असतात. एका व्हिडीओच्या कॅप्शनला तर ‘अनलाईक करना मना है’ अशा आशयाचे धमकीदायक कॅप्शन दिलं गेलंय. वास्तविक, अशा व्हिडीओंना ‘लाईक’ शेकडोत तर ‘अनलाईक’ एकही नसल्याचं पाहायला मिळतं. भीती हे त्यामागचं कारण असावं.
‘बर्थ डे’ ठरतोय निमित्त..
व्हिडीओ तयार करण्यासाठी ‘बर्थ डे’चं निमित्त शोधलं जातंय. बर्थ डेच्या शुभेच्छा देण्याबरोबरच ‘मिक्सिंग’ करून दहशतपूर्ण व्हिडीओ बनविण्याकडे अनेकांचा कल आहे. ही दहशत फोटोतील हावभाव, शस्त्र, गाणी, डायलॉगद्वारे दिसून येते.
भाई बोले तो...!
वेगवेगळ्या ‘सॉफ्टवेअर’ आणि ‘अ‍ॅप्लिकेशन’वर तयार केल्या जाणाºया ‘स्लाईड शो’मध्ये संबंधितांकडून फिल्मी ‘डायलॉग’ टाकले जातायत. तसेच गोळीबार, तलवार, वादळाचे आवाज टाकून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्नही केला गेलाय. हे डायलॉग आणि आवाज भीतीदायक असेच आहेत.
कट्टा, तलवार, चाकूही...
सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडीओ पाहिल्यास अनेक व्हिडीओंमध्ये शस्त्रांचे फोटो टाकण्यात आल्याचे दिसते. काही व्हिडीओमध्ये बंदूक, गावठी कट्टा, पिस्तूल यासारखी शस्त्र आहेत. तर काही व्हिडीओमध्ये काडतुसे. काहींमध्ये तलवार. तर काहींमध्ये चाकूसारख्या धारदार शस्त्राच्या फोटोंचा वापर केला गेलाय.

Web Title: 'Air' in free; Gangsters 'social' gangsters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.