Satara News: साखर कारखान्यात मशीनच्या बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:41 IST2025-12-09T13:40:14+5:302025-12-09T13:41:32+5:30
तातडीने त्याला मशीनमधून बाहेर काढले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Satara News: साखर कारखान्यात मशीनच्या बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू
फलटण : दत्त इंडिया साखर कारखाना साखरवाडी, ता. फलटण येथील कारखान्यामध्ये काम करत असताना मशीनच्या बेल्टमध्ये अडकून एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना दि. ७ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. सोहम संतोष भिसे (वय १९, रा. होळ, ता. फलटण, जि. सातारा) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साखरवाडी येथील दत्त इंडिया साखर कारखान्यात सोहम भिसे हा काम करत होता. त्यावेळी अचानक कारखान्यामधील मशीनच्या बेल्टमध्ये तो अडकला. हा प्रकार कारखान्यातील इतर कर्मचारी व कामगारांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने त्याला मशीनमधून बाहेर काढले. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
याबाबत संतोष अप्पासो भिसे (वय ४७, रा. होळ ता. फलटण जि. सातारा) यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, रजिस्टरला अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे. हवालदार महादेव पिसे हे अधिक तपास करत आहेत.