कोयना पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 04:37 PM2020-09-25T16:37:28+5:302020-09-25T16:38:59+5:30

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कमी असून, शुक्रवारी सकाळपर्यंत कोयनेला ५, नवजा येथे ८ आणि महाबळेश्वरला ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात आवक कमी झाल्याने दरवाजातून पाणी सोडणे बंद असून, पायथा वीजगृहातून फक्त १०५० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. पाणी आवकवर धरणातील विसर्ग अवलंबून आहे.

1050 cusec discharge from Koyna base power plant | कोयना पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक विसर्ग सुरू

कोयना पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक विसर्ग सुरू

Next
ठळक मुद्देकोयना पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक विसर्ग सुरू दरवाजे बंदच : आवकवर पाणी सोडण्याचा निर्णय अवलंबून

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कमी असून, शुक्रवारी सकाळपर्यंत कोयनेला ५, नवजा येथे ८ आणि महाबळेश्वरला ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात आवक कमी झाल्याने दरवाजातून पाणी सोडणे बंद असून, पायथा वीजगृहातून फक्त १०५० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. पाणी आवकवर धरणातील विसर्ग अवलंबून आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागात मागील काही दिवसांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे तलावात चांगला पाणीसाठा झाला आहे. तर ओढे वाहून बंधारे भरले आहेत. पूर्व भागात सध्या पीक काढणी सुरू असतानाच पाऊस पडू लागला आहे. या तुलनेत पश्चिमेकडे पाऊस कमी आहे.

मागील २० दिवसांत पश्चिम भागात तर तुरळक स्वरुपातच पाऊस पडला. मात्र, मंगळवारी आणि बुधवारी पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, कास, बामणोली या भागात चांगला पाऊस झाला. त्यामुळे कोयना धरण भरले. मंगळवारी मध्यरात्रीपासून कोयना धरणातून पाण्याचा पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला.

मात्र, गुरुवारी सायंकाळी धरणाचे दरवाजे बंद करून विसर्गही थांबविण्यात आला. तर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास धरणाच्या पायथा वीजगृहातील विसर्ग कमी करण्यात आला. २१०० वरून १०५० क्यूसेक विसर्ग सुरू होता. तर धरणात १०५.१४ टीएमसी पाणीसाठा होता. पावसाच्या स्थितीवर धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.

दरम्यान, कोयनानगर येथे शुक्रवारी सकाळपर्यंत ५ मिलिमीटर पाऊस झाला. तर यावर्षी जूनपासून आतापर्यंत कोयनेला ४३११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नवजाला ८ तर यावर्षी आतापर्यंत ४९९८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरला सकाळपर्यंतच्या २४ तासांत ९ आणि जूनपासून ४९६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, सातारा शहरासह परिसरात पावसाची उघडीप कायम आहे. दिवसभर ढगाळ वातावरण कायम असते.

Web Title: 1050 cusec discharge from Koyna base power plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.