म्हैसाळ योजनेचे पाणी दोन दिवसात सुरू होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 02:31 PM2021-07-27T14:31:38+5:302021-07-27T14:32:55+5:30

Flood Dam Sangli: कोयना व चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने सध्या पुरसदृश परीस्थिती निर्माण झाली आहे.ही परीस्थिती कमी करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून म्हैसाळ योजनेचे पाणी उपसा करून दुष्काळी भागाला सोडण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

Water of Mahisal Yojana is likely to start in two days | म्हैसाळ योजनेचे पाणी दोन दिवसात सुरू होण्याची शक्यता

म्हैसाळ योजनेचे पाणी दोन दिवसात सुरू होण्याची शक्यता

googlenewsNext
ठळक मुद्देम्हैसाळ योजनेचे पाणी दोन दिवसात सुरू होण्याची शक्यता शासनस्तरावर आदेश आल्यास म्हैसाळ योजना सुरू होण्याची शक्यता

सुशांत घोरपडे

म्हैसाळ : कोयना व चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने सध्या पुरसदृश परीस्थिती निर्माण झाली आहे.ही परीस्थिती कमी करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून म्हैसाळ योजनेचे पाणी उपसा करून दुष्काळी भागाला सोडण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

म्हैसाळच्या योजना ही दुष्काळी भागाला संजीवनी ठरणारी योजना म्हणून ओळखली जाते.आता म्हैसाळ नदीक्षेत्रात 536 मीटर पाणी पातळी आहे. उन्हाळ्यात या योजनेतून पाणी उपसा करून दुष्काळी भागाला पाणी पुरवठा केला जातो व अनेक तलाव भरून घेतले जातात.गेल्या वर्षी ही पुर स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी म्हैसाळ योजनेतून 1.75 टीमसी इतके पाणी उपसा केले होते.याचा फायदा महापुर कमी करण्यासाठी झाला होता.

या वर्ष या विभागाने मार्च महिन्यातच पाणी योजनेचे आवर्तन सुरू केले होते. सध्याची परीस्थित नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हैसाळ योजनेचे पाणी उपसा करण्याबाबत शासनस्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती सांगली पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता मिलिंद नाईक यांनी फोन वरून दिली. दोन दिवसात शासनस्तरावर आदेश आल्यास म्हैसाळ योजना सुरू होण्याची शक्यता आहे.


सध्या स्थितीमध्ये म्हैसाळ येथे 536 मीटर इतकी पाणी पातळी आहे.आज म्हैसाळ योजनेची पाहणी केली. वरीष्ठ पातळीवरून आदेश आल्यास तात्काळ म्हैसाळ योजना सुरू करू.यासाठी सर्व यंत्रणा तयार आहे.
-सुर्यंकांत नलवडे
कार्यकारी अभियंता
पाटबंधारे विभाग
सांगली.

Web Title: Water of Mahisal Yojana is likely to start in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.