कृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटांनी वाढण्याची शक्यता; कर्नाळ रस्त्यावर पाणी, स्थलांतर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 08:18 AM2021-07-23T08:18:52+5:302021-07-23T08:19:36+5:30

कोयनेतून दुपारपर्यंत ५० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

Water level of Krishna river is likely to rise by another 10 12 feet migration started | कृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटांनी वाढण्याची शक्यता; कर्नाळ रस्त्यावर पाणी, स्थलांतर सुरू

कृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटांनी वाढण्याची शक्यता; कर्नाळ रस्त्यावर पाणी, स्थलांतर सुरू

Next
ठळक मुद्देकोयनेतून दुपारपर्यंत ५० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

कोयनेतून आज दुपारपर्यंत ५० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे कृष्णा नदीतील पाणी पातळी सध्याच्या पाणीपातळी पेक्षा दहा ते बारा फुटाने अधिक वाढू शकते. त्यादृष्टीने नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण सुरू करावे, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे. 


सांगलीमध्ये आयर्विन पूल येथे पाणीपातळी सकाळी सात वाजता ३९ फूट होती. ती ५० ते ५२ फुटांपर्यंत वर जाऊ शकते याची नोंद घेऊन सखल भागातील नागरिकांनी, नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे. नदीपात्रात कोणीही जाऊ नये, यासाठी प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. सांगली शहरातील कर्नाळ रस्त्यावर पाणी आले असून, या परिसरातील नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे.

Web Title: Water level of Krishna river is likely to rise by another 10 12 feet migration started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app