शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

भरतनाट्यम्द्वारे अभिश्री साकारणार ‘विठाई दर्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:24 IST

बाबासाहेब परीट ।लोकमत न्यूज नेटवर्कबिळाशी : कला ही वेडाची बहीण आहे. कलेची साधना अंतर्मनातून केली तर, जीवन समृध्द होते. सातत्यपूर्ण सराव आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर तामिळनाडूस्थित कोकरुड (ता. शिराळा, जि. सांगली) येथील लेकीने वयाच्या १५ व्यावर्षी भरतनाट्यम् या नृत्यप्रकारात स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. अभिश्री आनंद पाटील ही युवा नृत्यांगना ...

बाबासाहेब परीट ।लोकमत न्यूज नेटवर्कबिळाशी : कला ही वेडाची बहीण आहे. कलेची साधना अंतर्मनातून केली तर, जीवन समृध्द होते. सातत्यपूर्ण सराव आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर तामिळनाडूस्थित कोकरुड (ता. शिराळा, जि. सांगली) येथील लेकीने वयाच्या १५ व्यावर्षी भरतनाट्यम् या नृत्यप्रकारात स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. अभिश्री आनंद पाटील ही युवा नृत्यांगना कोल्हापूरच्या शाहू स्मारकामध्ये आज घडविणार आहे ‘विठाई दर्शन..!’अभिश्री पाटील ही तामिळनाडूचे सचिव व कोकरुड (ता. शिराळा) येथील आयएएस अधिकारी आनंद पाटील यांची कन्या. घरात कोणतीही नृत्याची पूर्वपिठिका नसताना इयत्ता तिसरीत अभिश्रीला भरतनाट्यम्ची आवड निर्माण झाली. आई राजश्री पाटील या एम. बी. ए. व इंजिनिअर आहेत. त्यांनी तिच्यातील नृत्यकलेला ओळखले आणि प्रोत्साहित केले.भरतनाट्यम् नृत्यांगना वासंती श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अभिश्रीने नृत्याचे धडे गिरवायला सुरुवात केली.नियमित सराव आणि कलेवरची श्रध्दा, योग्य मार्गदर्शन यामुळे अभिश्रीचा आत्मविश्वास वाढत गेला आणि तिने स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. सध्या अभिश्री इयत्ता अकरावीत शिकते. दहावीत ती विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली आहे. तिचे मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ व फ्रेंच आदी भाषांवर प्रचंड प्रभुत्व आहे. वडील सनदी अधिकारी असले तरी, शिक्षणाबरोबर एखादी कला आत्मसात करावी, अशी त्यांचीही अपेक्षा होती. त्यामुळेच त्यांनी तिला या कला प्रकारासाठी उत्तेजन दिले, तर आई राजश्री यांनी कलेसाठी उत्तेजन देऊन त्यासाठी लागणारा वेळही दिला. आजोबा लक्ष्मण पाटील यांनीही तिला बळ दिले. भरतनाट्यम्मध्ये अव्वल स्थान पटकावण्याचा तिचा इरादा आहे. दररोज ती एक तास सराव करते.गुरु वासंती श्रीधर या दिल्लीवरुन फेस टाईम या अ‍ॅपद्वारे तिला मार्गदर्शन करतात. ‘स्वयंम निर्मिती सावळे विठाई’ या शिर्षकाखाली ३ तासांचा भरतनाट्यम्चा प्रयोग करुन एका वेगळ्या नृत्य प्रकारात मराठी लेक सामर्थ्याने उभी रहात आहे. मुद्रा अभियनातही तिने अल्पावधित स्वत:चा वकूब निर्माण केला आहे. विठ्ठलाच्या भेटीसाठी आर्तपणे व्याकुळ हाक देणाºया भक्तरूपी नर्तिका (अभिश्री) स्वत:ला विठ्ठलमय करुन टाकत रसिकांना प्रत्यक्ष पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाचा साक्षात्कार घडवणार आहे.कोल्हापूरच्या शाहू स्मारकात आज कार्यक्रमकोल्हापूर येथील शाहू स्मारकात सायंकाळी ४ वाजता होणाºया कार्यक्रमात अभिश्रीला बहुविध अभिनय, निपुणता दर्शविणाºया नृत्यासाठी तंजावर केशवंत (मृदंग), रघू राम (बासरी), वासंती कृष्णराव (गायन), वासंती श्रीधर (बोल) आदी दिग्गज कलाकार साथ देणार आहेत.