विट्याचे नगरसेवक पद्मसिंह पाटील यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:19 AM2021-06-18T04:19:54+5:302021-06-18T04:19:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : विटा नगरपालिकेतील सत्ताधारी गटाचे विद्यमान नगरसेवक व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुतणे पद्मसिंह ...

Vita's corporator Padmasingh Patil resigns | विट्याचे नगरसेवक पद्मसिंह पाटील यांचा राजीनामा

विट्याचे नगरसेवक पद्मसिंह पाटील यांचा राजीनामा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : विटा नगरपालिकेतील सत्ताधारी गटाचे विद्यमान नगरसेवक व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुतणे पद्मसिंह सुभाष पाटील यांनी गुरुवारी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे दिला. नगरसेवक पाटील यांच्या या राजीनामा सत्राने पालिकेच्या राजकीय पटलावर खळबळ उडाली आहे.

विटा नगरपालिकेच्या सन २०१६ च्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे नेते माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पद्मसिंह पाटील यांनी प्रभाग क्र. ११ मधून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते.

नगरसेवक पाटील यांनी अचानक आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे सादर केला.

घरगुती अडचणीमुळे मी काम करू शकत नसल्याचे कारण देत नगरसेवक पाटील यांनी माझा राजीनामा त्वरित मंजूर करण्याची विनंती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, सत्ताधारी गटाचे नेते व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुतणे असलेले नगरसेवक पद्मसिंह पाटील यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिल्याने विटा शहरात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Web Title: Vita's corporator Padmasingh Patil resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.