सॅनिटायझर आहे, हात धुण्यास पाणीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 08:17 PM2020-05-27T20:17:00+5:302020-05-27T20:19:22+5:30

कोरोनामुळे फिजिकल डिस्टन्सिंग महत्त्वाचे आहे. त्यामुळे पूर आल्यानंतर कशाप्रकारे फिजिकल डिस्टन्सिंग पाळून नागरिकांनी एकमेकाला मदत करावी, नियमांचे कसे पालन करावे, यावर सध्या नागरिकांना माहिती देण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी बुधवारी अग्निशमन विभागाचे पथक शामरावनगरमधील विश्वविजय चौकात गेले होते.

There is a netizer, no water for hand washing | सॅनिटायझर आहे, हात धुण्यास पाणीच नाही

सॅनिटायझर आहे, हात धुण्यास पाणीच नाही

Next
ठळक मुद्देशामरावनगरमधील महिलांचा संताप : आपत्तीपूर्व प्रशिक्षणावेळी गोंधळ

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले जात असताना, शहरातील शामरावनगरमधील महिलांनी मात्र सॅनिटायझर आहे, पण हात धुण्यासाठी पाणी कुठे आहे, असा जाब बुधवारी प्रशासनाला विचारला. यावेळी नगरसेवक अभिजित भोसले, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नसिमा नाईक यांनी नागरिकांची समजूत काढून त्यांना शांत केले. हा प्रकार महापुराबाबत आपत्तीपूर्व प्रशिक्षण देण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांसमोर घडला.

महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. आतापर्यंत आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यापैकी पाचजण बरे झाले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन कष्ट घेत असताना महापालिकेने आता संभाव्य पूरस्थितीशी मुकाबला करण्याची तयारी चालविली आहे. गतवर्षी महापुराचा मोठा दणका सांगली शहराला बसला होता. त्यामुळे यंदा महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून पूरपट्ट्यात नागरिकांत जनजागृती व आपत्तीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन केले जात आहे.

कोरोनामुळे फिजिकल डिस्टन्सिंग महत्त्वाचे आहे. त्यामुळे पूर आल्यानंतर कशाप्रकारे फिजिकल डिस्टन्सिंग पाळून नागरिकांनी एकमेकाला मदत करावी, नियमांचे कसे पालन करावे, यावर सध्या नागरिकांना माहिती देण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी बुधवारी अग्निशमन विभागाचे पथक शामरावनगरमधील विश्वविजय चौकात गेले होते. तिथे नागरिकांना पूरस्थितीत कोणती काळजी घ्यावी, याची माहिती दिली जात होती. मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याची सूचना देण्यात येत होती. यावेळी काही महिलांनी घरात सॅनिटायझर आहे, पण हात धुण्यासाठी पाणीच नाही, अशी तक्रार केली.

गेल्या महिन्याभरापासून शामरावनगर परिसरात पाण्याचा अपुरा पुरवठा होत आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली नाही. मग सॅनिटायझर असून काय उपयोग? असा सवालही महिलांनी केला. यावेळी प्रभागातील नगरसेवक अभिजित भोसले, नसिमा नाईक यांनी नागरिकांची समजूत काढली. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांशीही संपर्क केला. त्यानंतर अग्निशामक विभागाकडून आपत्तीपूर्व प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी समाजकल्याण समिती सभापती स्नेहल सावंत, महिला बालकल्याण सभापती नसिमा नाईक, नगरसेवक अभिजित भोसले, रज्जाक नाईक, अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी चिंतामणी कांबळे, सबफायर आॅफिसर विजय पवार उपस्थित होते.

 

Web Title: There is a netizer, no water for hand washing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.