मिरज-शेणोली मार्गावर विद्युत इंजिनची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:42 PM2020-12-22T16:42:22+5:302020-12-22T16:47:15+5:30

Miraj Railway Sangli- मिरज-पुणे रेल्वेमार्गावर मिरज-शेणोली व शेणोली- ताकारीदरम्यान मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून विद्युत इंजिनची चाचणी यशस्वी झाली.

Test of electric engine on Miraj-Shenoli route | मिरज-शेणोली मार्गावर विद्युत इंजिनची चाचणी

मिरज-शेणोली मार्गावर विद्युत इंजिनची चाचणी

Next
ठळक मुद्देमिरज-शेणोली मार्गावर विद्युत इंजिनची चाचणी रेल्वेची शेणोली-ताकारीची चाचणीही यशस्वी

मिरज : मिरज-पुणे रेल्वेमार्गावर मिरज-शेणोली व शेणोली- ताकारीदरम्यान मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून विद्युत इंजिनची चाचणी यशस्वी झाली.

मिरज स्थानकात ज्ञानेश्वर पोतदार यांच्याहस्ते विधिवत विद्युत इंजिनची पूजा करून चाचणीसाठी इंजिन शेणोलीकडे सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी रवाना करण्यात आले. यावेळी रेल्वे अधिकारी उपस्थित होते.

पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणासह दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. मिरज-पुणे रेल्वेमार्गावर मिरज-शेणोली ६३.२९ किमी व शेणोली-ताकारी १६.१५ किमी दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या मार्गावर सोमवारी विद्युत इंजिनची चाचणी यशस्वी झाली.

दरम्यान, मिरज-पुणे रेल्वेमार्गावर दुहेरीकरण, विद्युतीकरणासह विविध कामे करण्यात येत आहेत. या दुहेरीकरणासाठी या मार्गावर ७० टक्के मातीकाम सुरू आहे.

पुण्याजवळ पूल उभारणीचे काम सुरू आहे. पुणे-फुरसुंगीपर्यंतच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरण पूर्ण झाल्याने या मार्गावर यापूर्वीच चाचणी घेण्यात आली असून तीही यशस्वी झाली होती

Web Title: Test of electric engine on Miraj-Shenoli route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.