सदाभाऊ खोत यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून आमदारकी रद्द करा : अ‍ॅड. अमित शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 08:51 PM2019-09-01T20:51:13+5:302019-09-01T20:53:07+5:30

यावेळी प्रहारचे सुनिल सुतार, वंचितचे डॉ. विवेक गुरव, शाकिर तांबोळी, दिग्विजय पाटील उपस्थित होते. 

Take Preventive action against Sadabhau Khot and remove from member of legislative assembly : Adv. Amit Shinde | सदाभाऊ खोत यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून आमदारकी रद्द करा : अ‍ॅड. अमित शिंदे

सदाभाऊ खोत यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून आमदारकी रद्द करा : अ‍ॅड. अमित शिंदे

googlenewsNext
ठळक मुद्दे एसआयटी नेमावी अशी मागणी सुधार समितीचे अध्यक्ष  अ‍ॅड. अमित शिंदे यांनी केली. कडकनाथ कोंबडी चा घोटाळा हा अनेक राज्यामध्ये पसरला आहे. पोलिसांनी २४ तासात ही कारवाई न केल्यास नाईलाजास्तव पोलिसांविरुद्ध न्यायालयात जावे लागेल.

सांगली - कडकनाथ घोटाळ्याबद्दल आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पत्रकार परिषद घेऊन खालच्या पातळीची भाषा वापरत मंत्री सदाभाऊ खोत यांनी धमकावले आहे. हा प्रकार अतिशय धक्कादायक असून याची गंभीर दखल घेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून मंत्रीपद व आमदारकी रद्द करावी तसेच कडकनाथ घोटाळा अनेक राज्यात पसरला असल्याने त्याबाबत एसआयटी नेमावी अशी मागणी सुधार समितीचे अध्यक्ष  अ‍ॅड. अमित शिंदे यांनी केली. यावेळी प्रहारचे सुनिल सुतार, वंचितचे डॉ. विवेक गुरव, शाकिर तांबोळी, दिग्विजय पाटील उपस्थित होते. 

यावेळी बोलताना अ‍ॅड. अमित शिंदे म्हणाले की, कडकनाथ कोंबडी चा घोटाळा हा अनेक राज्यामध्ये पसरला आहे. छत्तीसगड मधील शेतकऱ्यांनी त्याबाबत सांगलीमध्ये पोलीस अधिक्षक यांचेकडे तक्रार दाखल केली आहे. त्याबाबत सामाजिक संघटनांनी आंदोलन पुकारलेले आहे. याबाबत मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते हे महारयतच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना दमबाजी करत आहेत. त्याबाबतचे विडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनीच गुन्हे दाखल करावेत अशी भूमीका आंदोलनकर्त्यांनी घेतली. आपला संबंध जोडल्यामुळे चिडून जाऊन  मंत्री सदा खोत यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनकर्त्याविरुध्द अतिशय घाणेरडी भाषा वापरली. तुमच्या श्राद्धच जेवण मी जेवणार, सावज टप्यात आल्यावर शिकार करणार, तुमच्या छाताडावर नाचणार अशी असंसदीय भाषा वापरून जाहीररित्या आंदोलनकर्त्यांनी धमक्या दिल्या आहेत. हा प्रकार अतिशय गंभीर असून महाराष्ट्राच्या इतिहासात कोणाही मंत्र्याने इतक्या खालच्या पातळीची भाषा वापरली नाही. या धमकीची दखल घेऊन पोलिसांनी मंत्री सदा खोत यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. आंदोलनकर्त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी त्याला मंत्री सदाभाऊ खोत हे जबाबदार असतील. पोलिसांनी २४ तासात ही कारवाई न केल्यास नाईलाजास्तव पोलिसांविरुद्ध न्यायालयात जावे लागेल. तसेच या प्रकाराची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी घेऊन सदाभाऊ खोत यांचे मंत्रिपद व आमदारकी रद्द करावी अशीही मागणी यावेळी त्यांनी केली. 
तसेच छत्तीसगड, राजस्थान व इतर राज्यातील शेतकऱ्यांची देखील या प्रकरणात फसवणूक झाली असल्याने याची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमावी तसेच या घोटाळ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना विशेष अनुदान देऊन त्यांना खाद्य व इतर सोइ पुरवाव्यात अशीही मागणी त्यांनी केली.या पत्रकार परिषदेला अ‍ॅड. सुभाष पाटील, नामदेव करगणे, प्रा. वासुदेव गुरव, जयंत जाधव, महालिंग हेगडे, संतोष शिंदे, अल्ताफ पटेल उपस्थित होते.

Web Title: Take Preventive action against Sadabhau Khot and remove from member of legislative assembly : Adv. Amit Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.