सांगलीत गणरायाचे जल्लोषात स्वागत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 11:34 PM2019-09-02T23:34:50+5:302019-09-02T23:35:00+5:30

सांगली : भक्तिसागरात न्हाऊन निघालेले भाविक... उत्साहाच्या उधाणलेल्या लाटा... नयनरम्य आरास, विद्युत रोषणाईचा थाट... रंगीबेरंगी रांगोळ््या, अगरबत्तीच्या सुगंधाचा दरवळ ...

Sangli Republic welcomes ... | सांगलीत गणरायाचे जल्लोषात स्वागत...

सांगलीत गणरायाचे जल्लोषात स्वागत...

Next

सांगली : भक्तिसागरात न्हाऊन निघालेले भाविक... उत्साहाच्या उधाणलेल्या लाटा... नयनरम्य आरास, विद्युत रोषणाईचा थाट... रंगीबेरंगी रांगोळ््या, अगरबत्तीच्या सुगंधाचा दरवळ अशा मंगलमयी वातावरणात आणि बाप्पा मोरयाऽऽऽच्या गजरात गणरायाच्या सांगली नगरीत सोमवारी बाप्पांचे जल्लोषी आगमन झाले.
महापुराच्या कटू आठवणी विसरून गणरायाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या भाविकांना यावेळी त्याच्या स्वागताच्या तयारीला फारसा वेळ मिळाला नाही. तरीही गेल्या दोन दिवसात बाजारपेठांमध्ये खरेदीला झालेली गर्दी आणि सर्वत्र तयारीचा उत्साह दिसून आला. उत्साही लाटेवर स्वार होत भाविकांनी सोमवारी गणरायाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. पहाटेपासूनच घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती आणण्यासाठी लगबग सुरू होती. त्यामुळे सकाळी सातपासूनच बाजार फुलला होता. दिवसभर सांगलीच्या हरभट रस्ता, मारुती रस्ता परिसरात साहित्य खरेदीसाठी गर्दी होती. मारुती रस्ता, गावभाग, बसस्थानक परिसर, कर्मवीर भाऊराव पाटील चौक याठिकाणी मूर्ती खरेदीसाठी गर्दी होती. महापुरामुळे यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळांनी घेतल्यामुळे शहरात दिवसभर कुठेही सवाद्य मिरवणुका दिसल्या नाहीत. शांततेत आणि बाप्पा मोरयाच्या गजरात साध्या पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
भगव्या-पांढऱ्या टोप्या, शेला, फेटा परिधान करून पारंपरिक पद्धतीने मंडळांनी गणरायाचे स्वागत केले. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यंदा पारंपरिक ढोल-ताशा, लेझिम, झांजपथक यांना फाटा दिला. महापुरामुळे खर्चात काटकसर करीत मंडळांनी या गोष्टी टाळल्या. त्यामुळे वाद्यवादन पथकांना मोठा फटका बसला. सांगली शहर व परिसरात कार्यकर्त्यांची दिवसभर लगबग सुरू होती. यावेळी शहरात कोठेही देखावे नाहीत. देखावे, मंदिरांच्या प्रतिकृती, आरास यामुळे सांगलीचा गणेशोत्सव राज्यात वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो, मात्र यंदा महापुरानंतर आलेल्या उत्सवातून देखावे, आरास यांना फाटा देण्यात आला आहे. गणरायाचे आगमन होत असतानाच सांगलीच्या बाजारपेठा सोमवारी गर्दीने फुलल्या होत्या. गणेशमूर्ती, पूजा व आरास साहित्य खरेदीसाठी दिवसभर भाविकांची लगबग सुरू होती.

Web Title: Sangli Republic welcomes ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.