सांगलीत डॉल्फिन ग्रुपतर्फे कृष्णा काठावर २०० बांबूचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 11:31 AM2021-03-22T11:31:55+5:302021-03-22T11:34:23+5:30

environment River Sangli-कृष्णाकाठ सुरक्षित रहावा, काठावरच्या मातीचे धूप होऊ नये, पुराचा धोका काठाला कमी प्रमाणात व्हावा म्हणून येथील डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप यांच्यातर्फे कृष्णा काठावर २०० बांबूची रोपे लावण्यात आली.  या उपक्रमामध्ये शेरी नाल्यापासून उत्तरेला कृष्णा काठावर साधारणपणे ३० फूट उंचीवर बांबू रोपण करण्यात आले. रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप या पर्यावरणवादी संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे.

Sangli Dolphin Group planting 200 bamboos on the banks of Krishna | सांगलीत डॉल्फिन ग्रुपतर्फे कृष्णा काठावर २०० बांबूचे रोपण

सांगलीत डॉल्फिन ग्रुपतर्फे कृष्णा काठावर २०० बांबूचे रोपण

Next
ठळक मुद्देसांगलीत डॉल्फिन ग्रुपतर्फे कृष्णा काठावर २०० बांबूचे रोपणपुराचा धोका काठाला कमी व्हावा म्हणून हाती घेतला उपक्रम

संजयनगर/सांगली ः कृष्णाकाठ सुरक्षित रहावा, काठावरच्या मातीचे धूप होऊ नये, पुराचा धोका काठाला कमी प्रमाणात व्हावा म्हणून येथील डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप यांच्यातर्फे कृष्णा काठावर २०० बांबूची रोपे लावण्यात आली.  या उपक्रमामध्ये शेरी नाल्यापासून उत्तरेला कृष्णा काठावर साधारणपणे ३० फूट उंचीवर बांबू रोपण करण्यात आले. रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप या पर्यावरणवादी संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे.

या कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे संस्थापक शशिकांत ऐनापुरे, अध्यक्ष अरुण कांबळे, सचिव पद्मजा पाटील, धनंजय वाघ, मनोजकुमार मुळीक यांनी केले. तर  सोनाली जाधव, अन्सार मगदूम, आदिती कुंभोजकर, रुकसाना मगदूम, अर्चना ऐनापुरे, प्रवीण मगदूम, बाळासाहेब शितोळे, ऋषिकेश ऐनापुरे , मानवी बरगाले,  नित्या पाटील, दिनेश पाटील, मुस्तफा मुजावर, अल्फिया मगदूम, सचिन चोपडे, प्रा. विकास आवळे, पुष्कर मगदूम, अमेय पाटील आदी सदस्य सहभागी झाले होते.

स्वच्छ्ता करणे, खड्डे काढण्यापासून ते रोप  लावून त्याभोवती वाफे करून पाणी घालण्यापर्यंत सगळं डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप सदस्यांनी श्रमदानातून केलं. तक्षशिला शाळेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनीही या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. माझी माय कृष्णा लोकचळवळ चे प्रणेते डॉ. मनोज पाटील, आर.एफ.ओ. सुतार, सामाजिक वनीकरणचे कांबळे यांनी या प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली.

Web Title: Sangli Dolphin Group planting 200 bamboos on the banks of Krishna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.