Sangli District Bank Elections : ‘करेक्ट कार्यक्रमा’मुळे जमदाडे ठरले ‘जायंट किलर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 02:01 PM2021-11-24T14:01:12+5:302021-11-24T14:02:01+5:30

विठ्ठल ऐनापुरे जत : जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील विद्यमान संचालक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत यांच्या पराभवाने काँग्रेसला माेठा धक्का ...

Sangli District Bank Elections Jamdade becomes Giant Killer | Sangli District Bank Elections : ‘करेक्ट कार्यक्रमा’मुळे जमदाडे ठरले ‘जायंट किलर’

Sangli District Bank Elections : ‘करेक्ट कार्यक्रमा’मुळे जमदाडे ठरले ‘जायंट किलर’

Next

विठ्ठल ऐनापुरे
जत : जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील विद्यमान संचालक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत यांच्या पराभवाने काँग्रेसला माेठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीमधील काही घटकांनीच सावंत यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याने भाजपच्या पॅनेलमधील प्रकाश जमदाडे ‘जायंट किलर’ ठरले.

विधानसभा निवडणुकीत जतमधून सलग तीन वेळा म्हणजेच १५ वर्षे भाजपचा आमदार निवडून आला. त्याला २०१९च्या निवडणुकीत काँग्रेसचे विक्रम सावंत यांनी छेद दिला. मात्र निवडणुकीनंतर चारच महिन्यात कोरोनामुळे विकासकामे थांबली. दुसरीकडे जत तालुक्यांत तहसीलदार, गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक यासह विविधअधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यानेही विकास खुंटला. महिनोंमहिने ही पदे रिक्त होती. यामुळे सावंत यांच्याबाबत नाराजी व्यक्त हाेत हाेती.

कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनीही विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्याकडे विशेष लक्ष दिलेले नाही. डफळापूर येथे खासगी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात घोषणा केली, तो अद्याप सुरू झालेला नाही. याचा फायदा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी उचलला. जतला सहा टीएमसी पाणी देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे अनेक दिग्गज राष्ट्रवादीत गेले. यामध्ये प्रकाश जमदाडे व मन्सूर खतीब यांचाही समावेश होता. या दोघांना जिल्हा बँकेत संधी देण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले होते. महाविकास आघाडीमुळे जमदाडे यांना उमेदवारी देता येत नव्हती. दरम्यान, भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्याशी हातमिळवणी करून जमदाडे यांना संधी देण्यात आली व त्यांना निवडूनही आणले गेले. यामुळे तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे.

Web Title: Sangli District Bank Elections Jamdade becomes Giant Killer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.