सांगलीत गर्भपात, नशेची औषधे आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:11 AM2019-11-23T00:11:52+5:302019-11-23T00:12:04+5:30

सांगली : गर्भपात आणि नशेच्या औषधांची आॅनलाईन विक्री गेल्या काही दिवसात वाढली आहे. लोकांच्या जीविताशी चाललेला हा खेळ थांबविण्याची ...

Sangal abortion, drug addiction online | सांगलीत गर्भपात, नशेची औषधे आॅनलाईन

सांगलीत गर्भपात, नशेची औषधे आॅनलाईन

Next

सांगली : गर्भपात आणि नशेच्या औषधांची आॅनलाईन विक्री गेल्या काही दिवसात वाढली आहे. लोकांच्या जीविताशी चाललेला हा खेळ थांबविण्याची मागणी केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनेने केली आहे.
सांगली जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे संचालक विनायक शेटे म्हणाले, आॅनलाईन औषधविक्रीचा कायदा पूर्णत: संमत झालेला नाही, तरीही अॉनलाईन कंपन्यांच्या संकेतस्थळांवर ती खुलेआम उपलब्ध आहेत. प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देता येत नसल्याने, कंपन्यांनी बनावट प्रिस्क्रिप्शन तयार करणारी यंत्रणा उभारली आहे. २० ते ३० टक्के डिस्काऊंटसह विक्री होते.
झोपेच्या गोळ्या, सेक्सशी संबंधित औषधे, शरीरसौष्ठवाच्या गोळ्या, गर्भपात तसेच नशेची औषधे आॅनलाईन मिळतात. दुकानात प्रिस्क्रिप्शनशिवाय दिली जात नाहीत. हिशेबाचे त्रांगडे नको, म्हणून अनेक व्यावसायिक ती ठेवतच नाहीत. पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी एका कारवाईत नशेची औषधे पकडली होती. संशयितांनी ती जयसिंगपुरातील एका दुकानातून घेतल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला असता, तेथे बेकायदा औषधे आढळली. अन्न व औषध विभागाने कारवाई करत दुकान सील केले. सध्या खटला सुरु आहे. औषधांच्या गैरवापराचे व कारवाईचे हे उदाहरण समोर असल्याने, दुकानदार त्यांची विक्री शक्यतो टाळतात.
हा मार्ग बंद झाल्याने त्यांचा ग्राहकवर्ग आता आॅनलाईनकडे वळला आहे. काही गोळ्या दारुमध्ये मिसळून पिल्यास अधिक नशा येते, हे लक्षात आल्याने त्यांची आॅनलाईन विक्री वाढल्याचे आढळले आहे. सांगली-मिरजेत जास्त प्रमाणात मागवली जात आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
पार्सलची संख्या : वाढली
जिल्ह्यात अॉनलाईनची पार्सल पोहोचवणाऱ्या कुरिअर यंत्रणेकडे हल्ली औषधांच्या पार्सलची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे केमिस्ट संघटनेच्या लक्षात आले. विशेषत: सांगली-मिरज शहरे व नजीकच्या गावांत त्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे.

Web Title: Sangal abortion, drug addiction online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.