Rohit Patil : 'स्वर्गीय आबांची आठवण मनात दाटून येतेय, आज त्यांनाही आनंद झाला असेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 04:08 PM2022-01-19T16:08:19+5:302022-01-19T16:19:15+5:30

Rohit Patil : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणूकीत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला अभूतपूर्व विजय आपण मिळवून दिलात

Rohit Patil : Rohit patil remember R.R. Patil after victory of nagarpanchayat election in sangli | Rohit Patil : 'स्वर्गीय आबांची आठवण मनात दाटून येतेय, आज त्यांनाही आनंद झाला असेल'

Rohit Patil : 'स्वर्गीय आबांची आठवण मनात दाटून येतेय, आज त्यांनाही आनंद झाला असेल'

googlenewsNext

सांगली - राज्यातील १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतींच्या ३३६ जागांसाठी आणि १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ जागांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. कवठेमहांकाळ नगरपंचायत (kavathe mahankal nagar panchayat election 2022 result) राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी राजकारणात यशस्वी प्रवेश केला आहे. या विजयानंतर रोहित पाटील यांना दिवंगत नेते आणि वडिल आर.आर. पाटील यांची आठवण झाली.  

कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणूकीत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला अभूतपूर्व विजय आपण मिळवून दिलात. विजयानंतर खऱ्या अर्थाने जबाबदारी वाढते, कवठेमहांकाळ आणि परिसराच्या विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत, असे रोहित पाटील यांनी विजयानंतर म्हटले आहे. तसेच, सर्वच नागरिकांचे आभार मानत आज स्वर्गीय आबांची आठवण मनात दाटून येत आहे. आबांनाही नक्कीच आजच्या विजयाचा आनंद झाला असेल, असेही ते म्हणाले.  


राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, सहकारी यांनी जी रात्रंदिवस मेहनत घेतली, सुमनताईंच्या अनुपस्थितीत माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आपण विश्वास दाखवला. कवठेमहांकाळातील सुजाण नागरिक, कार्यकर्ते मित्र, सहकारी, पत्रकार, राज्यभरातील हितचिंतक ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष  या निवडणूकीत मोलाची मदत केली त्या प्रत्येकांचा हा विजय आहे, असे म्हणत रोहित पाटीय यांनी आपल्या विजयाचे श्रेय सर्वांना दिले.  

राष्ट्रवादी काँग्रेसचा कवठेमहांकाळ नगरपंचायतीत विजय झाला असून रोहित पाटील यांनाही विजय मिळाला आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनलला १०, तर शेतकरी विकास पॅनलला ६ जागांवर विजय मिळाला. तर एका जागी अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. 

रोहित पाटलांनी दिली प्रतिक्रिया

दरम्यान, "निवडणुकीच विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं होतं. माझ्या बापाची पुण्याई म्हणाले, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही," अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी विजयानंतर दिली.
 

Web Title: Rohit Patil : Rohit patil remember R.R. Patil after victory of nagarpanchayat election in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.