प्राचीन मार्कंडेश्वर मंदिराचा नरेंद्र मोदींच्या हस्ते जीर्णोद्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 02:18 AM2020-09-15T02:18:29+5:302020-09-15T02:19:10+5:30

कृष्णदेवनंद गिरी महाराज म्हणाले, मिरजेच्या कृष्णा घाटावर मार्कंडेश्वर ऋषींनी स्थापन केलेल्या ४०० वर्षांपूर्वीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे.

Renovation of ancient Markandeshwar temple by Narendra Modi | प्राचीन मार्कंडेश्वर मंदिराचा नरेंद्र मोदींच्या हस्ते जीर्णोद्धार

प्राचीन मार्कंडेश्वर मंदिराचा नरेंद्र मोदींच्या हस्ते जीर्णोद्धार

Next

मिरज : मिरजेच्या कृष्णा घाटावरील प्राचीन मार्कंडेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार १ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या वजनाची रक्ततुला करुन ११ हजार बाटल्या रक्त देशाच्या सीमेवर जवानांसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूर्यपीठ मुरली मंदिर, द्वारका जुना आखाडाचे पीठाधीश्वर जगद्गुरू सूर्याचार्य श्री कृष्णदेवनंद गिरी महाराज यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
कृष्णदेवनंद गिरी महाराज म्हणाले, मिरजेच्या कृष्णा घाटावर मार्कंडेश्वर ऋषींनी स्थापन केलेल्या ४०० वर्षांपूर्वीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. यानिमित्त मुख्य कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांना आमंत्रित करण्यात
आले आहे.

Web Title: Renovation of ancient Markandeshwar temple by Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.