प्रधानमंत्री सुरक्षा व जीवन ज्योती विमा योजनेचे नुतनिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 07:31 PM2020-05-26T19:31:34+5:302020-05-26T21:38:27+5:30

सुरक्षा विमा योजना ही अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व यासाठी रुपये 2 लाखांचे विमा संरक्षण देणारी योजना असून वय वर्षे 18 ते 70 या वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात. या योजनेचा वार्षीक हप्ता रु 12/- फक्त इतका आहे. जीवन ज्योती विमा योजना ही नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास रुपये 2 लाखांचे विमा संरक्षण देणारी योजना असून वय वर्षे 18 ते 50 या वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात.

Renewal of Pradhan Mantri Suraksha and Jeevan Jyoti Bima Yojana | प्रधानमंत्री सुरक्षा व जीवन ज्योती विमा योजनेचे नुतनिकरण

प्रधानमंत्री सुरक्षा व जीवन ज्योती विमा योजनेचे नुतनिकरण

Next
ठळक मुद्देलिंक केलेल्या बचत खात्यावर 30 मे पर्यंत पुरेशी रक्कम जमा करा-- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली: प्रधानमंत्री सुरक्षा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सर्वांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. या योजना बँका व पोस्ट ऑफिसमार्फत गरीब व वंचित घटकांसाठी प्राधान्याने राबविल्या जात आहेत. या योजनांचे 31 मे 2020 रोजी नुतनिकरण होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये कार्यरत सर्व बँकांच्या व पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून 5 लाख 41 हजार ग्राहकांनी सुरक्षा विमा योजनेत तर 2 लाख 39 हजार ग्रहाकांनी जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्याची लोकसंख्या पाहता हे प्रमाण कमी आहे. यासाठी या विमा योजनांमध्ये यापुर्वी पासून सहभाग झालेल्यांच्या खात्यातून 31 मे 2020 रोजी विमा हप्ता नावे टाकण्यात येणार आहे.

ज्यांच्या खात्यांवर पुरेशी रक्कम असणार नाही, ते योजनेतून बाहेर पडतील व त्यांना या योजनांचा लाभ मिळणार नाही. यासाठी सर्वांनी आपल्या लिंक केलेल्या बचत खात्यावर दिनांक 30 मे पर्यंत पुरेशी रक्कम जमा करावी. तसेच जे पात्र व्यक्ती या योजनेत सामील झाले नाहीत, त्यांनी सामील होऊन या योजनांचा लाभ घ्यावा. त्यासाठी आपले खाते असलेल्या बँकेत अथवा पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

सुरक्षा विमा योजना ही अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व यासाठी रुपये 2 लाखांचे विमा संरक्षण देणारी योजना असून वय वर्षे 18 ते 70 या वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात. या योजनेचा वार्षीक हप्ता रु 12/- फक्त इतका आहे. जीवन ज्योती विमा योजना ही नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास रुपये 2 लाखांचे विमा संरक्षण देणारी योजना असून वय
वर्षे 18 ते 50 या वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात. या योजनेचा वार्षिक हप्ता 330/- फक्त इतका आहे. या योजनांतर्गत सहभाग घेण्यासाठी एक पानी साधा फॉर्म भरुन आपल्या खाते असणाऱ्या बँकेत/पोस्टात द्यावयाचा आहे. बँक/पोस्ट ऑफिस आपल्या खात्यातून ऑटो डेबिट पध्दतीने विमा हप्ता कपात करुन विमा कंपनीला पाठवते. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

Web Title: Renewal of Pradhan Mantri Suraksha and Jeevan Jyoti Bima Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.