खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांनी कोविड रूग्णांची माहिती देणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 06:34 PM2021-05-14T18:34:53+5:302021-05-14T18:38:01+5:30

CoronaVirus Sangli : सद्यस्थितीत कोविड रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यानुसार सर्दी, ताप व इतर कोविड सदृश्‍य लक्षणे असणाऱ्या व्यक्ती खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांच्या बाह्य रूग्ण विभागात उपचाराकरिता येतात. अशा कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्या रूग्णांची माहिती आरोग्य यंत्रणेला देणे आवश्यक आहे. अशा रूग्णांना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे आर.टी.पी.सी.आर. अथवा ॲन्टीजन टेस्ट करण्याकरिता संदर्भित करावे. जेणेकरून कोविड बाधित रूग्णांवर त्वरीत उपचार सुरू करून रूग्णांचा रस्रड2 मेंनटेन करता येईल व संभाव्य मृत्यू टाळता येतील, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

Private medical practitioners are required to inform Kovid patients | खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांनी कोविड रूग्णांची माहिती देणे आवश्यक

खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांनी कोविड रूग्णांची माहिती देणे आवश्यक

Next
ठळक मुद्देखाजगी वैद्यकीय व्यवसायीकांनी कोविड रूग्णांची माहिती देणे आवश्यक संशयीत कोविड रूग्णाबाबतची माहिती लपविल्यास कारवाई- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली  : सद्यस्थितीत कोविड रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यानुसार सर्दी, ताप व इतर कोविड सदृश्‍य लक्षणे असणाऱ्या व्यक्ती खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांच्या बाह्य रूग्ण विभागात उपचाराकरिता येतात. अशा कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्या रूग्णांची माहिती आरोग्य यंत्रणेला देणे आवश्यक आहे. अशा रूग्णांना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे आर.टी.पी.सी.आर. अथवा ॲन्टीजन टेस्ट करण्याकरिता संदर्भित करावे. जेणेकरून कोविड बाधित रूग्णांवर त्वरीत उपचार सुरू करून रूग्णांचा रस्रड2 मेंनटेन करता येईल व संभाव्य मृत्यू टाळता येतील, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

संशयित कोविड रूग्ण कोविड तपासणी न करता किरकोळ उपचाराकरिता इतरत्र फिरत असल्याने कोविड संसर्गाचा प्रसार वाढत असून अशा रूग्णांना वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. रूग्णांची माहिती आरोग्य यंत्रणेला कळविण्यासाठी गुगल शीट तयार करण्यात आली असून खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांच्या बाह्यरूग्ण विभागात येणाऱ्या व कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्या सर्व रूग्णांची माहिती दैनंदिन    https://forms.gle/Ejnqw1JWCvQARV7J7  या गुगल फॉर्म मध्ये भरावी. ॲन्टीजन तपासणी करण्याकामी परवानगी हवी असल्यास जिल्हा प्रशासनाकडे अर्ज करावा.

बाह्यरूग्ण विभागात उपचाराकरिता आलेल्या संशयीत कोविड रूग्णाबाबतची माहिती लपविल्यास अथवा रूग्णास नजीकच्या आरोग्य तपासणी करण्याकरिता संदर्भित केले नसल्याचे निदर्शनास आल्यास अथवा अशा रूग्णांचा दुर्देवी मृत्यू झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये व भारतीय साथरोग अधिनियम 1897 नुसार आणि Section 2(a) (iii) Maharashtra Essential Services Maintenance Act  2005 2005 अन्वये कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ष्ट केले आहे.

Web Title: Private medical practitioners are required to inform Kovid patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.