पलूसचा तरुण अपघातात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:26 AM2021-03-08T04:26:08+5:302021-03-08T04:26:08+5:30

सांगली : विटा-मायणी रोडवर दुचाकी आणि चारचाकीत झालेल्या अपघातात पलूस येथील तरुण जखमी झाला. बंडू रंगराव मोरकट्टे (वय ३८) ...

Palus's young man injured in an accident | पलूसचा तरुण अपघातात जखमी

पलूसचा तरुण अपघातात जखमी

Next

सांगली : विटा-मायणी रोडवर दुचाकी आणि चारचाकीत झालेल्या अपघातात पलूस येथील तरुण जखमी झाला. बंडू रंगराव मोरकट्टे (वय ३८) असे जखमीचे नाव असून शनिवारी रात्री ८ च्या सुमारास हा अपघात झाला. त्यास उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

--

संजयनगरला एकास मारहाण

सांगली : शहरातील संजयनगरमध्ये एकास दगडाने मारहाण करण्यात आली. सिद्धार्थ लक्ष्मण पवार (वय ४७) असे जखमीचे नाव आहे. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

--

आटपाडीतील महिलेस विषबाधा

सांगली : आटपाडी येथील महिलेस विषबाधा झाली. सरिता शांताराम पवार (वय ५५) असे त्यांचे नाव असून रविवारी दुपारी हा प्रकार घडला. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

--

मौजे डिग्रजला महिलेस विषबाधा

सांगली : मौजे डिग्रज येथील तीसवर्षीय महिलेस विषबाधा झाली. नीता आनंदा कोळी असे त्यांचे नाव असून रविवारी दुपारी २ वा.च्या सुमारास ही घटना घडली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Palus's young man injured in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.