पलूसला डॉक्टर्स कोविड सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:26 AM2021-04-13T04:26:24+5:302021-04-13T04:26:24+5:30

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार पलूसमध्ये स्टेडियम शेजारील इमारतीत कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ...

Palusla launches Doctors Covid Center | पलूसला डॉक्टर्स कोविड सेंटर सुरू

पलूसला डॉक्टर्स कोविड सेंटर सुरू

Next

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार पलूसमध्ये स्टेडियम शेजारील इमारतीत कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे.

जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दि. ७ एप्रिल रोजी पलूस तहसीलदार निवास ढाणे, डॉ. अधिक पाटील व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रागिणी पवार यांनी डॉक्टर्स कोविड हॉस्पिटलची पाहणी करून हॉस्पिटल सुरू केल्याचे जाहीर केले.

डॉक्टर्स कोविड हॉस्पिटलमध्ये पलूसमधील एम.डी. मेडिसिन डॉ. पृथ्वीराज पाटील, डॉ. संगीता देशमुख, डॉ. श्रीकांत परमने, डॉ. मनोजकुमार इंगळकर, डॉ. मिलिंद जोशी, डॉ. आशुतोष पाटील, डॉ. नरेश बाबर, डॉ. सागर वरुडे, डॉ. प्रदीप भोसले व डॉ. अमोल पवार हे सक्रिय सहभागी आहेत. तरी परिसरातील अत्यवस्थ कोविड रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय प्रमुख डॉ. अमोल पवार यांनी आवाहन केले आहे.

Web Title: Palusla launches Doctors Covid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.