मिरज तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 02:09 PM2019-10-05T14:09:01+5:302019-10-05T14:10:00+5:30

सांगली जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 4.80 मि. मी. पावसाची नोंद झाली असून मिरज तालुक्यात सर्वाधिक 11.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Most recorded rainfall in Miraj taluka | मिरज तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद

मिरज तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद

googlenewsNext
ठळक मुद्देमिरज तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद कोयना, वारणा, धोम, दुधगंगा, अलमट्टी धरणे 100 टक्के भरली

सांगली : जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 4.80 मि. मी. पावसाची नोंद झाली असून मिरज तालुक्यात सर्वाधिक 11.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

कालपासून आज सकाळपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी कंसात 1 जुनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज - 11.1 (651.3), जत - निरंक (306.4), खानापूर-विटा 5.2 (502.6), वाळवा-इस्लामपूर 7.5 (807.6), तासगाव - 3.6 (511.1), शिराळा 1.3 (1956.2), आटपाडी 1 (326.2), कवठेमहांकाळ 3 (422), पलूस 5.5 (539.1) व कडेगाव 6.6 (90.3.2).

कोयना, वारणा, धोम, दुधगंगा, अलमट्टी ही धरणे 100 टक्के भरली असून कण्हेर व राधानगरी ही धरणे 99 टक्के भरली आहेत. कालवा व विद्युतगृहाव्दारे कोयना धरणातून 1 हजार 50 क्युसेक्स, वारणा धरणातून 496 क्युसेक्स, तर अलमट्टी धरणातून 15 हजार 991 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

Web Title: Most recorded rainfall in Miraj taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.