महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे आतापर्यंत सोळा हजारांहून अधिक पंचनामे - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 10:28 PM2021-08-03T22:28:37+5:302021-08-03T22:29:06+5:30

Sangli : जिल्ह्यात महापुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे , ओढ्यांना जादा पाणी आल्याने मिरज, वाळवा, पलूस व शिराळा या चार तालुक्यातील 113 गावे बाधित झाले आहेत.

More than sixteen thousand panchnama of the damage caused by the flood so far - Collector | महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे आतापर्यंत सोळा हजारांहून अधिक पंचनामे - जिल्हाधिकारी

महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे आतापर्यंत सोळा हजारांहून अधिक पंचनामे - जिल्हाधिकारी

Next

सांगली : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून  जिल्हयात महापूरामुळे बाधित झालेल्या 113 गावांमधील  आतापर्यंत 16 हजार 879 कुटुंबांचे पंचनामे झाले आहेत. बाधित गावातील कुंटुंबे, कृषी, पशुधन व व्यावसायिक नुकसानीचे पंचनामे  युद्धपातळीवर  पूर्ण  करण्यासाठी यंत्रणा गतीने कार्यरत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

जिल्ह्यात महापुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे , ओढ्यांना जादा पाणी आल्याने मिरज, वाळवा, पलूस व शिराळा या चार तालुक्यातील 113 गावे बाधित झाले आहेत. महापालिका क्षेत्र तसेच ग्रामीण क्षेत्रातील एकूण 45 हजार 352 कुटुंबे बाधित झाली आहेत. शासन निर्देशानुसार बाधित गावातील कुटुंबे, कृषी, पशुधन व व्यावसायिक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत.

यामध्ये आज अखेरआज अखेर 16 हजार 879 कुटुंबांचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यामध्ये पूर्ण नष्ट झालेली कच्ची घरे 279, पक्की घरे 8, अशंत नष्ट झालेली कच्ची घरे 1 हजार 78, पक्की घरे 320, नुकसान झालेल्या झोपड्या 34 व गोठे 619 आहेत. अजूनही पंचनामे सुरू असून ते गतीने पूर्ण करण्यासाठी यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत.

आज अखेर मयत पशुधनापैकी 96 लहान, माठे जनावरे व 49508 पक्षांचे पंचनामे करण्यात आले आहेत. तसेच आज अखेर 27 कारागीरांचे सहयंत्राचे, 39 कारागीरांच्यां कच्चा व तयार मालाचे व 2279 छोटे उद्योग, दुकाने, टपरीधारक, हातगाडीधारक इत्यादीचे पंचनामे नुसार नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. या बाबींचे पंचनामेदेखील अजूनही सुरू आहेत.

जिल्ह्यात महापूरामुळे 274 गावांतील 97 हजार 486 शेतकऱ्यांचे 40 हजार 671 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. आज अखेर 174 गावांतील 24 हजार 781 शेतकऱ्यांचे 8 हजार 508.72 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.    

मिरज तालुक्यातील 26 गावांतील 29 हजार 117 शेतकऱ्यांचे 10 हजार 340 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे त्यापैकी 21 गावांतील 3 हजार 712 शेतकऱ्यांचे 1 हजार 728.64 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

वाळवा तालुक्यातील 98 गावांतील 31 हजार 245 शेतकऱ्यांचे 13 हजार 495 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे त्यापैकी 41गावांतील 7 हजार 701 शेतकऱ्यांचे 2 हजार 697.60 हेक्टर पंचनामे पूर्ण झाले आहेत.

शिराळा तालुक्यातील 95 गावांतील 15 हजार 350 शेतकऱ्यांचे 6 हजार 631 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे त्यापैकी  87 गावांतील 8 हजार 786 शेतकऱ्यांचे 1 हजार 893.61 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

पलूस तालुक्यातील 26 गावांतील 21 हजार 595 शेतकऱ्यांचे 10 हजार 146 हेक्टर बाधित झाले आहे त्यापैकी  23 गावांतील 4 हजार 523 शेतकऱ्यांचे 2 हजार 162.18 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

तासगाव  तालुक्यातील 2 गावांतील 179  शेतकऱ्यांचे 59 हेक्टर बाधित झाले आहे त्यापैकी  2 गावांतील 59 शेतकऱ्यांचे 26.69 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

Web Title: More than sixteen thousand panchnama of the damage caused by the flood so far - Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.