सांगली जिल्ह्यात 14 हजाराहून अधिक विस्थापितांवर औषधोपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 05:22 PM2019-08-13T17:22:10+5:302019-08-13T17:24:20+5:30

सांगली ‍जिल्ह्यात पुराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर लोकांना स्थलांतरीत होण्याची वेळ आली असून, पूरग्रस्तांवर उपचारासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. चार तालुक्यांमध्ये 14 हजार 891 लोकांवर औषधोपचार करण्यात येत आहे.

More than 14 thousand displaced persons in Sangli district receive treatment from 67 medical teams | सांगली जिल्ह्यात 14 हजाराहून अधिक विस्थापितांवर औषधोपचार

सांगली जिल्ह्यात 14 हजाराहून अधिक विस्थापितांवर औषधोपचार

googlenewsNext
ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात 14 हजाराहून अधिक विस्थापितांवर औषधोपचार 67 वैद्यकीय पथक जिल्ह्यात

सांगली : ‍जिल्ह्यात पुराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर लोकांना स्थलांतरीत होण्याची वेळ आली असून, पूरग्रस्तांवर उपचारासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. चार तालुक्यांमध्ये 14 हजार 891 लोकांवर औषधोपचार करण्यात येत आहे.

मिरज तालुक्यातील हरिपूर, मौजे डिग्रज, पद्माळे, नांद्रे, समडोळी, सावळवाडी, माळवाडी, दुधगाव, कसबे डिग्रज, तुंग, कवठेपिरान, अंकली, ढवळी, निलजी/बामणी, जुनी धामणी, म्हैसाळ या 16 गावांतील एकूण 1 हजार 30 विस्थापितांवर 16 पथकांद्वारे औषधोपचार करण्यात आले आहेत.

पलूस तालुक्यातील बुरुंगवाडी, भिलवडी स्टेशन, माळवाडी, खंडोबाचीवाडी, वसगडे, नागठाणे, अंकलखोप, विठ्ठलवाडी, दह्यारी, रामानंदनगर, दुधोंडी, पलूस या 15 गावांतील 6 हजार 484 विस्थापितांवर 17 पथकांद्वारे वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र, कासेगाव, नेर्ले, बावची, वाळवा, बागणी, बोरगाव, येलूर, कुरळप या ग्रामीण भागातील एकूण 4 हजार 921 विस्थापितांवर 23 पथकांद्वारे वैद्यकीय उपचार सुरू आहेत. तसेच इस्लामपूर नगरपालिका क्षेत्रामध्ये मसुचीवाडी, शिगाव, वाळवा, बोरगाव, बहे, खरातवाडी, साटपेवाडी, हुबालवाडी, खरातवाडी, बोरगाव, गौडवाडी या गावांतील 1 हजार 288 विस्थापितांवर 6 पथकांद्वारे वैद्यकीय उपचार करण्यात आला आहेत.

कसबे बीड, नागठाणे, औदुंबर, दुधगाव, सांगलवाडी, कसबे डिग्रज, अंकलखोप या गावांतील 1 हजार 168 विस्थापितांवर आष्टा नगरपालिका क्षेत्रामध्ये वैद्यकीय उपचार सुरू आहेत. असे वाळवा तालुक्यातील एकूण 7 हजार 377 विस्थापितांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. शिराळा तालुक्यातील सागाव, पुनवत, मांगले, देववाडी या गावातील विस्थापितांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.





 

Web Title: More than 14 thousand displaced persons in Sangli district receive treatment from 67 medical teams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.