Kusumtai Nayakawadi passed away in sangli | कुसुमताई नायकवडी यांचे निधन 
कुसुमताई नायकवडी यांचे निधन 

सांगली : हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समुहाच्या मार्गदर्शिका व जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या पत्नी कुसुमताई नागनाथ नायकवडी (वय 88) यांचे बुधवारी रात्री साडेनऊ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

कुसुमताई यांच्या पार्थिवावर गुरुवार दुपारी दीड वाजता हुतात्मा संकुलातील नागनाथ अण्णांच्या स्मारकाशेजारी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या मागे मुलगा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी, बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी आणि दोन विवाहित मुली, तीन सुना असा परिवार आहे. कुसुमताई या मुख्याध्यापिका होत्या. नागनाथअण्णा यांच्या चळवळीत त्या खांद्याला खांदा लावून सक्रिय होत्या. कुसुमताईंच्या निधनानंतर ज्येष्ठ आणि मान्यवरांनी जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. 

Web Title: Kusumtai Nayakawadi passed away in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.