सांगलीत कृष्णेची पातळी 30.2 फुटावर, एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 12:22 PM2019-09-09T12:22:13+5:302019-09-09T12:24:18+5:30

हवामान खाते मुंबई यांच्याकडील अंदाजानुसार सातारा जिल्ह्याकरिता तीन दिवसाकरिता अतिवृष्टीचा इशारा प्राप्त झाला असून सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे प्रमुख धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे.

Krishna level in Sangli at 30.2 feet | सांगलीत कृष्णेची पातळी 30.2 फुटावर, एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण

सांगलीत कृष्णेची पातळी 30.2 फुटावर, एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण

Next
ठळक मुद्देसांगलीत कृष्णेची पातळी 30.2 फुटावर, खबरदारीची उपाययोजनाएनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण

सांगली : हवामान खाते मुंबई यांच्याकडील अंदाजानुसार सातारा जिल्ह्याकरिता तीन दिवसाकरिता अतिवृष्टीचा इशारा प्राप्त झाला असून सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे प्रमुख धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे.

यात 103.51 टीएमसी पाणीसाठा असणाऱ्या कोयना धरणातून 69 हजार 739 क्युसेस, धोम धरणातून 6 हजार 995 क्युसेस, कन्हेर धरणातून 5180 क्युसेस, उरमोडी धरणातून 4 हजार 286 क्युसेस, तारळी धरणातून 1601 क्युसेस आणि वारणा धरणातून 11 हजार 894 क्युसेस विसर्ग सुरू आहे.

या विसर्गामुळे आयर्विन पुल सांगली येथील पाणी पातळीमध्ये वाढ होऊन सध्या ती 30.2 फूट झाली आहे. सध्याचे पर्जन्यमान व कोयना व इतर धरणातून वाढलेला विसर्ग यांचा विचार करता ती 34 ते 35 फुटापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

नदीकाठच्या विशेषतः वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील तसेच महानगरपालिका क्षेत्रातील नदीकाठावरील व सखल भागातील लोकांनी सावधानता बाळगावी व नदीपात्रामध्ये कोणीही जाऊ नये. असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

त्याच प्रमाणे खबरदारीची उपाययोजना म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये एनडीआरएफ ची दोन पथके दाखल झाली असून एक पथक इस्लामपूर येथे व एक पथक मिरज येथे तयारीत ठेवण्यात आलेले आहे. सध्या प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. खबरदारी म्हणून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत. सद्यस्थितीत नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष क्रमांक 1077 व 0233-2600500 / 9370333932 / 8208689681, पाटबंधारे नियंत्रण कक्ष 0233-2301820 / 2302925 यावरती संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
 

Web Title: Krishna level in Sangli at 30.2 feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.