जीप -होंडासिटीत समोरासमोर धडक, पाच जण जखमी, गाडीमध्ये जिलेटीनच्या तीन कांड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 01:40 PM2021-04-07T13:40:44+5:302021-04-07T13:43:01+5:30

Accident Sangli Crimenews- औढी ( ता.शिराळा) येथे जीप व होंडा सिटी यांची समोरासमोर धडक होऊन पाच जण जखमी झाले आहेत. तसेच होंडा सिटी गाडीमध्ये जिलेटीन या स्फोटकाच्या तीन कांड्या सापडल्या आहेत. या अपघातानंतर होंडा सिटीचा चालक पळून गेला आहे. याबाबत विनापरवाना स्फोटके ठेवल्याबद्दल व अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपघात सोमवार दि.५ रोजी रात्री ८ च्या दरम्यान घडला.

Jeep-Honda City collides head-on, injuring five | जीप -होंडासिटीत समोरासमोर धडक, पाच जण जखमी, गाडीमध्ये जिलेटीनच्या तीन कांड्या

जीप -होंडासिटीत समोरासमोर धडक, पाच जण जखमी, गाडीमध्ये जिलेटीनच्या तीन कांड्या

Next
ठळक मुद्देजीप -होंडासिटीत समोरासमोर धडक, पाच जण जखमी गाडीमध्ये जिलेटीनच्या तीन कांड्या

शिराळा : औढी ( ता.शिराळा) येथे जीप व होंडा सिटी यांची समोरासमोर धडक होऊन पाच जण जखमी झाले आहेत. तसेच होंडा सिटी गाडीमध्ये जिलेटीन या स्फोटकाच्या तीन कांड्या सापडल्या आहेत. या अपघातानंतर होंडा सिटीचा चालक पळून गेला आहे. याबाबत विनापरवाना स्फोटके ठेवल्याबद्दल व अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपघात सोमवार दि.५ रोजी रात्री ८ च्या दरम्यान घडला.

याबाबत माहिती अशी की , जीप ( क्रमांक एम एच ०४- क्यू ५९१८) ही जीप करमाळे हुन शिराळा कडे तर होंडा सिटी ही( एम एच ०१ वायए २४४९) शिराळा कडून करमाळे कडे निघाला होती. होंडा सिटी चालक वेगाने येऊन जीप गाडीस धडक दिली. ही धडक बसताच होंडा सिटी चालक पळून गेला. ही धडक एवढी जोरात होती की जीप गाडी पलटी झाली. यामध्ये जीप मधील फिर्यादी बबन बाळू पाटील , हणमंत मोहिते , राजाराम कदम , भानुदास माने , भगवान माने (सर्व रा.करमाळे ता.शिराळा) हे पाच जण जखमी झाले आहेत.या जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातानंतर होंडा सिटी चालक पळून गेला. या गाडीची तपासणी करत असताना त्यामध्ये जिलेटीन या स्फोटकाच्या तीन कांड्या सापडल्या आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात अपघातास कारणीभूत व विनापरवाना स्फोटके बाळगल्याबद्दल अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुमार वायदंडे हे करीत आहेत.

Web Title: Jeep-Honda City collides head-on, injuring five

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.