इस्लामपुरात कोटीच्या जुन्या नोटा केल्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 04:30 PM2019-05-03T16:30:30+5:302019-05-03T16:32:16+5:30

अडीच वर्षांपूर्वी चलनातून बाद केलेल्या ५00 व १000 रुपयांच्या एक कोटी रुपयांचे घबाड पोलिसांच्या हाती इस्लामपूर येथे लागले. जुन्या नोटा देऊन चलनातील नवीन नोटा घेण्यासाठी या नोटांची मोटारसायकलवरून वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. अन्य एक संशयित ताब्यात असून, त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

In Islampura, old coins worth crores were seized | इस्लामपुरात कोटीच्या जुन्या नोटा केल्या जप्त

इस्लामपुरात कोटीच्या जुन्या नोटा केल्या जप्त

Next
ठळक मुद्देइस्लामपुरात कोटीच्या जुन्या नोटा केल्या जप्तमोटारसायकलवरून नोटांची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

इस्लामपूर : अडीच वर्षांपूर्वी चलनातून बाद केलेल्या ५00 व १000 रुपयांच्या एक कोटी रुपयांचे घबाड पोलिसांच्या हाती इस्लामपूर येथे लागले. जुन्या नोटा देऊन चलनातील नवीन नोटा घेण्यासाठी या नोटांची मोटारसायकलवरून वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. अन्य एक संशयित ताब्यात असून, त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दीपक प्रल्हाद बाकले (रा. जुळेवाडी, ता. कऱ्हाड ) व दत्ता हरिसिंग हजारे (वय १९, रा. किल्लेमच्छिंद्रगड, ता. वाळवा) अशी अटकेत असणाऱ्या दोघांची नावे आहेत, तर रमेश मोहनराव पाटील (रा. नरसिंहपूर, ता. वाळवा) हा रुग्णालयात उपचार घेत आहे. या टोळीमध्ये अल्पवयीन मुलाचाही समावेश होता. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.

दत्ता हजारे ३0 एप्रिल रोजी सायंकाळी अल्पवयीन मुलास सोबत घेऊन, चलनातून बाद करण्यात आलेल्या ५00 व १000 रुपयांच्या नोटा मोटारसायकलवरून घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे, हवालदार गजानन जाधव, एस. एम. पेठकर, एस. आर. जगदाळे, के. एस. पाटील यांच्या पथकाने सापळा रचून नवीन तहसील कचेरीसमोरील हॉटेलसमोर ही कारवाई केली.

हजारे मुलासोबत सायंकाळी ५.३0 च्या सुमारास मोटारसायकलवरून (क्र. एमएच १0 डीबी ८१६२) आला. दोघांच्या मध्ये रेक्झीन बॅग, तर मुलाच्या पाठीवर सॅक होती. पोलिसांना त्यांचा संशय आल्यावर झडती घेण्यात आली.

यावेळी रेक्झीन बॅगेत ५२ लाख ५३ हजारांच्या, तर सॅकमध्ये ४७ लाख ४४ हजार ५00 रुपयांच्या चलनातून बाद केलेल्या नोटा मिळून आल्या. दीपक बाकले आणि रमेश पाटील या दोघांकडून ही रक्कम मिळाल्याचे हजारेने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी बाकले व पाटीलला ताब्यात घेतले.

केंद्र शासनाने वापरात आणण्यास प्रतिबंधित केलेल्या नोटा बाळगल्याचा आणि शासनाची फसवणूक केल्याचा ठपका या टोळक्यावर ठेवण्यात आला आहे. या रोकडमध्ये ५00 रुपयांच्या १८९ बंडलांचा समावेश आहे, तर एक हजार रुपयांच्या चार बंडलांचा समावेश आहे.

रोकडसह तीन मोबाईल, मोटारसायकल असा १ कोटी २८ हजार ५00 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक आशुतोष चव्हाण अधिक तपास करत आहेत.

Web Title: In Islampura, old coins worth crores were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.