अन्न व औषध प्रशासनातर्फे सांगलीत 30 आस्थापनांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 01:13 PM2019-08-17T13:13:49+5:302019-08-17T13:16:18+5:30

अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे  विविध ठिकाणच्या 30 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या आस्थानांना पूरग्रस्त जनतेला माफक दरात दुधाची विक्री करण्याबाबत व गुणवत्तापूर्वक दर्जाच्या जीवनावश्यक वस्तू, दूध व पाण्याचा पुरवठा हा रास्त व किफायतशीर किंमतीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. योग्य दर्जाच्या जीवनावश्यक वस्तू पाणी व दूध योग्य त्या किंमतीने न विकल्यास आस्थापना सील केल्या जातील, असा सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या.

Investigation of 30 establishments as reported by the Food and Drug Administration | अन्न व औषध प्रशासनातर्फे सांगलीत 30 आस्थापनांची तपासणी

अन्न व औषध प्रशासनातर्फे सांगलीत 30 आस्थापनांची तपासणी

googlenewsNext
ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासनातर्फे सांगलीत 30 आस्थापनांची तपासणीपूरग्रस्तांना रास्त दराने जीवनावश्यक वस्तु पुरवठा करण्याचे आवाहन

सांगली : अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे  विविध ठिकाणच्या 30 आस्थापनांची तपासणी करण्यात आली.

या आस्थानांना पूरग्रस्त जनतेला माफक दरात दुधाची विक्री करण्याबाबत व गुणवत्तापूर्वक दर्जाच्या जीवनावश्यक वस्तू, दूध व पाण्याचा पुरवठा हा रास्त व किफायतशीर किंमतीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. योग्य दर्जाच्या जीवनावश्यक वस्तू पाणी व दूध योग्य त्या किंमतीने न विकल्यास आस्थापना सील केल्या जातील, असा सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सु. आ. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली द. ह. कोळी, सु. मा. दांगट, र. ल. महाजन, अ. भु. कोळी, श्रीमती मे. स. पवार, सु. स. हाके, यांनी केली.

महिला लोकशाही दिन सोमवारी

पीडित व अन्यायग्रस्त महिलांच्या न्यायासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी राज्यस्तरीय व विभागीय स्तर, तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय व चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. या महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी दिली.
 

Web Title: Investigation of 30 establishments as reported by the Food and Drug Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.