लोकवर्गणीव्दारे उभारलेले हकीम लुकमान कोवीड सेंटर कौतुकास्पद : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 02:20 PM2020-09-21T14:20:54+5:302020-09-21T14:23:53+5:30

लोकवर्गणी गोळा करून सांगली येथे मोहंमदिया ॲग्लो उर्दू हायस्कूलच्या इमारतीत उभारण्यात आलेले १०० बेड्सचे हकीम लुकमान कोवीड सेंटर ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

Hakim Lukman Kovid Center set up by the people is commendable: Jayant Patil | लोकवर्गणीव्दारे उभारलेले हकीम लुकमान कोवीड सेंटर कौतुकास्पद : जयंत पाटील

लोकवर्गणीव्दारे उभारलेले हकीम लुकमान कोवीड सेंटर कौतुकास्पद : जयंत पाटील

Next
ठळक मुद्देलोकवर्गणीव्दारे उभारलेले हकीम लुकमान कोवीड सेंटर कौतुकास्पद : जयंत पाटीलपालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते सेंटरचे उद्घाटन

सांगली : सामाजिक बांधिलकी म्हणून सांगली येथील मुस्लिम समाजाच्या वतीने लोकवर्गणी गोळा करून सांगली येथे मोहंमदिया ॲग्लो उर्दू हायस्कूलच्या इमारतीत उभारण्यात आलेले १०० बेड्सचे हकीम लुकमान कोवीड सेंटर ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

मोहंमदिया ॲग्लो उर्दू हायस्कूलच्या इमारतीत उभारण्यात आलेले हकीम लुकमान कोवीड सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर गीता सुतार, आमदार सुधीर गाडगीळ, असिफबाई बाबा, नगरसेवक फिरोज पठाण, उमर गवंडी, कय्युम पटवेगार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना रूग्णांवर उपचारासाठी योग्य उपचार पध्दतीचा अवलंब केला पाहिजे. रूग्ण रूग्णालयात दाखल होताच तो पूर्णपणे बरा करण्यासाठी पूर्ण ताकद लावून काम केले पाहिजे. वेळेत व योग्य वेळी योग्य उपचार झाले पाहिजेत. यासाठी कोरोना बाधित रूग्णांना वेळेत ऑक्सिजन व औषधोपचार मिळणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी बेड्सची संख्या वाढविण्यात येत आहे.  मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांसमवेत जिल्ह्यातील डॉक्टरांशी झुमव्दारे संवाद साधण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात असिफभाई बाबा यांनी हकीम लुकमान कोवीड सेंटरमध्ये १०० बेड्स असून त्यामध्ये ५ व्हेंटीलेटर बेड, ४५ ऑक्सिजन बेड, ५० आयसोलेटेड बेड, २० तज्ज्ञ डॉक्टर, ४० नर्सिंग स्टाफ, प्रत्येक रूमला सीसीटीव्ही कॅमेरा, नातेवाईकांच्या संपर्कसाठी इंटरकॉम आदि सुविधा असल्याची माहिती दिली. 

कोविड सेंटर उभारणीसाठी मदत केलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. यावेळी काही दानशूर व्यक्तींनी या कोविड सेंटरसाठी देणगी दिली तसेच काहिंनी देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली.

Web Title: Hakim Lukman Kovid Center set up by the people is commendable: Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.