सांगलीत ९७ हजार ३८० रुपयांचे खाद्य पदार्थ जप्त, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 06:35 PM2020-09-16T18:35:26+5:302020-09-16T18:46:54+5:30

सांगलीत ९७ हजार ३८० रुपयांचे खाद्य पदार्थ जप्त करण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत तपासणी करुन ही करवाई करण्यात आली

Food confiscation of Rs 97,380 in Sangli, action taken by Food and Drug Administration | सांगलीत ९७ हजार ३८० रुपयांचे खाद्य पदार्थ जप्त, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

सांगलीत ९७ हजार ३८० रुपयांचे खाद्य पदार्थ जप्त, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देसांगलीत ९७ हजार ३८० रुपयांचे खाद्य पदार्थ जप्तअन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

सांगली : सांगलीत ९७ हजार ३८० रुपयांचे खाद्य पदार्थ जप्त करण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत तपासणी करुन ही करवाई करण्यात आली.

अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत शिवशक्ती नारायण फरसाण ॲन्ड स्वीटस, हसनी आश्रम रोड, महालक्ष्मी चौक, मिरा कॉलनी, विश्रामबाग, सांगली या आस्थापनेची तपासणी करुन करवाई करण्यात आली.

भेसळीच्या संशयावरुन रिफईन्ड पामोलिन तेल, फरसाण (बालाजी), व खारी बुंदी (बालाजी) या अन्नपदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेवून उर्वरित ९०६ किग्रॅ बजनाचा ९७ हजार ३८० रुपये इतका साठा जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सु. आ. चौगुले यांनी दिली.

या आस्थापनेची तपासणी केली असता पेढीमध्ये वापरलेले खाद्यतेल हे अस्वच्छ बॅरल मध्ये साठविले होते व ते फरसाण आणि बुंदी तळण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे आढळून आले. फरसाण व बुंदी बनविण्याकरिता खाद्य रंगाचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे. तसेच पेढीमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याचे आढळून आले आहे.

या खाद्यपदर्थाच्या नमुन्यांचा प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. फरसाण पॅकिगसाठी वापरण्यात येणारे लेबल चुकीच्या वर्णनाचे वापरण्यांत येत होते. पेढीविरुध्द खद्य रंगाचे वापर केल्याबाबत यापूर्वीही फौजदारी कारवाई झाली आहे. तरी सुध्दा ती फरसाण बनवितांना त्यात वापरास प्रतिबंध असलेला खाद्य रंगाचा वापर करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यांना व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख, सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन सांगली सु. आ. चौगुले, अन्न सुरक्षा अधिकारी द. ह. कोळी, श्रीमती हिरेमठ, स्वामी व नमुना सहायक कवळे यांनी केली.

Web Title: Food confiscation of Rs 97,380 in Sangli, action taken by Food and Drug Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.