सांगलीत मंडप डेकोरेशन साहित्याला आग, पस्तीस लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 06:41 PM2021-03-15T18:41:50+5:302021-03-15T18:49:09+5:30

Fire Sangli- सांगलीतील शंभर फुटी रोड येथील कासिम शेख यांच्या मंडप डेकोरेशन साहित्याच्या गोदामाला सोमवारी दुपारी एकच्या सुमाराला भीषण आग लागून सुमारे  तीस तीस ते पस्तीस लाखाचे नुकसान झाल्याचे अग्निशामक दलाचे प्रमुख चिंतामणी कांबळे यांनी सांगितले. आगीचे कारण समजले नाही.

Fire at Sangli mandap decoration material, loss of Rs 35 lakh | सांगलीत मंडप डेकोरेशन साहित्याला आग, पस्तीस लाखाचे नुकसान

सांगलीतील शंभर फुटी रोड येथील कासिम शेख यांच्या मंडप डेकोरेशन साहित्य आगीत खाक झाले छाया सुरेंद्र दुपटे (छाया -सुरेंद्र दुपटे)

Next
ठळक मुद्देसांगलीत मंडप डेकोरेशन साहित्याला आगपस्तीस लाखाचे नुकसान

संजय नगर/सांगली : सांगलीतील शंभर फुटी रोड येथील कासिम शेख यांच्या मंडप डेकोरेशन साहित्याच्या गोदामाला सोमवारी दुपारी एकच्या सुमाराला भीषण आग लागून सुमारे  तीस तीस ते पस्तीस लाखाचे नुकसान झाल्याचे अग्निशामक दलाचे प्रमुख चिंतामणी कांबळे यांनी सांगितले. आगीचे कारण समजले नाही.

सांगलीतील शंभर फुटी रोड येथील कासिम शेख यांच्या मंडप डेकोरेशन साहित्याला सोमवारी एकच्या सुमाराला अचानक आग लागली. ती आग एवढी तीव्र होती ते काही तासांमध्येच मंडप डेकोरेशन साहित्य खाक झाले. यामध्ये सुमारे तीस ते पस्तीस लाखाचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत नागरिकांनी अग्निशामक दलाला फोन केल्यानंतर काही वेळातच घटनास्थळी दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या. सुमारे एक तासानंतर आग आटोक्यात आणण्यास अग्निशामक दलास यश आले. यावेळी नागरिकांची प्रचंड गर्दी होती. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता.

महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख चिंतामणी कांबळे तसेच गणेश मोरे, उमेश सर्वदे, लिंगप्पा कांबळे, प्रशांत शिंदे, नितीन नाईक,  रामचंद्र चव्‍हाण, प्रसाद माने, अजित सावंत, अविनाश शेळके, रोहित निकम या कामगारांनी आग विझवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. 
 

Web Title: Fire at Sangli mandap decoration material, loss of Rs 35 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.