जनावरांच्या शेडला आग, जातिवंत बैलासह इतर जनावरे मृत्युमुखी, एक क्षणात सर्व काही संपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 02:12 PM2021-04-07T14:12:23+5:302021-04-07T14:13:15+5:30

Fire Framer Sangli- जनावरांच्या शेडला आग लागली आणि दोन जातिवंत बैलासह इतर जनावरे आगीत मृत्युमुखी पडले आणि एक क्षणात सर्व काही संपले, पूर्ण संसार उध्वस्त झाला. 

The fire in the animal shed, the death of other animals including the breed bull, all ended in an instant | जनावरांच्या शेडला आग, जातिवंत बैलासह इतर जनावरे मृत्युमुखी, एक क्षणात सर्व काही संपले

जनावरांच्या शेडला आग, जातिवंत बैलासह इतर जनावरे मृत्युमुखी, एक क्षणात सर्व काही संपले

googlenewsNext
ठळक मुद्दे जनावरांच्या शेडला आग, जातिवंत बैलासह इतर जनावरे मृत्युमुखीएक क्षणात सर्व काही संपले

विकास शहा

शिराळा  : येथील औढी रस्त्यावरील पाडळी हद्दीत यादव मळ्यातील तात्यासाहेब भांडवले यांच्या जनावरांच्या शेडला आग लागली आणि दोन जातिवंत बैलासह इतर जनावरे आगीत मृत्युमुखी पडले आणि एक क्षणात सर्व काही संपले, पूर्ण संसार उध्वस्त झाला. 

ज्याच्या शेतात काम करतात त्यांच्या शेताजवळ  तात्यासाहेब भांडवले यांनी जनावरांच्यासाठी मंडपवजा गोठा केला होता. या गोठ्यास सोमवार दि. ५ रोजी रात्री आग लागली.  या आगीत दोन जातिवंत बैल , दोन म्हैशी , एक वासरू , एक रेडकू अशी सहा जनावरे पाच शेळ्या, ६० ते ६५ कोंबड्या, मृत्युमुखी पडले. जनावरांचे शेड , पिंजर, शेती औजारे, सेन्टरिंगचे साहित्य, संसाराची भांडी सर्व काही जळून नऊ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले.

रात्री ८ च्या दरम्यान आग लागली असून आग विझविणाचे प्रयत्न सुरू होते. ही आग रात्री १ च्या दरम्यान विझली. आसपासच्या गावातील पाण्याच्या टाक्या आदीने ही आग विझवण्यात आली, मात्र तोपर्यंत सर्व काही संपले होते.

या आगीत एक गाभण म्हैस तसेच तात्यासाहेब ज्या बैलांच्यावर आपला जीव ओवाळून टाकत होते, तसेच अनेक शर्यतीत बक्षिसे मिळून देत होते त्या सुगर व सायब्या या बैलांचा जीव गेला. यावेळी शेकडो नागरिक, तलाठी शंभू कन्हेरे , पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. वाय. थोरात यांनी सहकार्य केले. हे कुटुंब उद्धवस्त झालेले पाहून त्याच ठिकाणी नागरिकांनी आर्थिक मदत गोळा करण्यास सुरुवात केली. आणखी मदत मिळावी यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

डोळ्यादेखत आगीमध्ये मृत्युमुखी पडली आवडती बैलजोडी

एक गुंठा जमीन नाही, दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून तात्यासाहेब भांडवले यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. तात्यासाहेब भांडवले यांना बैलगाडीच्या शर्यतीचा नाद आहे, या शर्यतीसाठी आणलेली सुगर व सायब्या ही जातिवंत आवडती बैलजोडी आणि जनावरे त्यांच्या डोळ्यादेखत आगीमध्ये मृत्युमुखी पडली, या बैलांच्यावर ते आपला जीव ओवाळून टाकत. प्रसंगी एक वेळ उपाशी राहिले होते. आणि आपण काहीही करू शकलो नाही याचे त्यांना मोठे दुःख आहे. 

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिली घटनास्थळी भेट 

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक , रणजितसिंह नाईक , सुखदेव पाटील , उत्तम डांगे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी जळीतग्रस्त शेतकरी तात्यासाहेब भांडवले, पोपट गायकवाड, विलास यादव, माणिक कदम ,महेश खबाले,राजेंद्र नलवडे,विकास शहा ,दिनेश हासबनिस, सुभाष नलवडे, हरिभाऊ कवठेकर, रामचंद्र पाटील यांचेसह शेतकरी, ग्रामस्थ व अधिकारी आदी उपस्थित होते.

बैल विकले नाहीत

या आगीतून एक रेडकू गोठ्याच्या दरवाज्यात होते, त्याचे दावे तात्यासाहेब यांच्या आईने कापून काढले त्यामुळे त्याचा प्राण वाचला. त्यास किरकोळ भाजले आहे., दोनच दिवसांपूर्वी सुगर व साहिब्याला पाच लाख रुपयेने विकत घेण्यास काहीजण आले होते मात्र तात्यासाहेब याने हे बैल विकले नाहीत.

Web Title: The fire in the animal shed, the death of other animals including the breed bull, all ended in an instant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.