ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण, अभिरुप मतदानही घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 03:26 PM2019-09-02T15:26:04+5:302019-09-02T15:28:02+5:30

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 च्या अनुषंगाने बीईएल कंपनीच्या एम-3 ईव्हीएम, व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन्सची प्रथमस्तरीय तपासणी वैरण बाजार, मिरज येथील शासकीय गोदाम येथे दिनांक 19 ते 31 ऑगस्ट 2019 या कालावधीत यशस्वीरित्या झाली.

EVM, VVPAT's first-level inspection also took full, favorable turnout | ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण, अभिरुप मतदानही घेतले

ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण, अभिरुप मतदानही घेतले

Next
ठळक मुद्देईव्हीएम, व्हीव्हीपॅटची प्रथमस्तरीय तपासणी पूर्णअभिरुप मतदानही घेतले

सांगली : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 च्या अनुषंगाने बीईएल कंपनीच्या एम-3 ईव्हीएम, व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन्सची प्रथमस्तरीय तपासणी वैरण बाजार, मिरज येथील शासकीय गोदाम येथे दिनांक 19 ते 31 ऑगस्ट 2019 या कालावधीत यशस्वीरित्या झाली.

प्रथमस्तरीय तपासणी झालेल्या मशिनपैकी 1 टक्के मशिन्सवर 1200, 2 टक्के मशिन्सवर 1000 व 3 मशिन्सवर 500 अधिरुप मतदान (मॉकपोल) मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीरित्या घेण्यात आले

प्रथमस्तरीय तपासणी झालेल्या 1 टक्के मशिनवर 04 इव मशिन लावूनही प्रात्येक्षिक घेण्यात आले. या अभिरुप मतदान प्रसंगी ईव्हीएम नोडल अधिकारी व उपजिल्हाधिकारी विवेक अगावणे, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी आरविंद लाटकर, उपविभागीय अधिकारी विकास खरात, तहसिलदार शरद पाटील, तहसिलदार योगेश खरमाटे, तहसिलदार अर्चना शेटे आदी उपस्थित होते.
 

Web Title: EVM, VVPAT's first-level inspection also took full, favorable turnout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.