ईव्हीएम, व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 03:28 PM2019-09-02T15:28:34+5:302019-09-02T15:29:51+5:30

मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यासूचनेनूसार विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन वापराबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते जनजागृती कार्यक्रमाचा आज प्रारंभ झाला.

EVM, the launch of the VVPAT awareness program | ईव्हीएम, व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास सुरुवात

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास सुरुवात

googlenewsNext
ठळक मुद्देईव्हीएम, व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास सुरुवातजनजागृती कक्षाची स्थापना

सांगली : मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यासूचनेनूसार विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन वापराबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते जनजागृती कार्यक्रमाचा आज प्रारंभ झाला.

सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 8 विधानसभा मतदारसंघ असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय 2 या प्रमाण 16 मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून 2405 मतदार केंदावर ईव्हीएम व्हीव्ही पॅट मशिन्सचे प्रात्येक्षिक दाखविण्यात येणार आहे. त्याच बरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशिनचे प्रात्येक्षिक व त्याची प्रत्येक्ष हताळणी नागरिकांना करता यावी म्हणून जनजागृती कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व शंकांचे निरसन करुन घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. जनजागृती कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी अपर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुला, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, रोहयो उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, तहसिदार मिरज शरद पाटील, सहायक पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल यांच्यासह अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.



 

Web Title: EVM, the launch of the VVPAT awareness program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.