बिनविरोध ग्रामपंचायतींचे श्रेय एकटेच लाटू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:27 AM2021-01-20T04:27:53+5:302021-01-20T04:27:53+5:30

वैभव पाटील म्हणाले, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पारे आणि खंबाळे (भा.) येथे धनशक्तीच्या जोरामुळे आम्हाला सत्तेपासून दूर राहावे लागले; ...

Don't take the credit of unopposed Gram Panchayat alone | बिनविरोध ग्रामपंचायतींचे श्रेय एकटेच लाटू नका

बिनविरोध ग्रामपंचायतींचे श्रेय एकटेच लाटू नका

Next

वैभव पाटील म्हणाले, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पारे आणि खंबाळे (भा.) येथे धनशक्तीच्या जोरामुळे आम्हाला सत्तेपासून दूर राहावे लागले; पण आमच्यावरच विरोधक धनशक्तीचा व दडपशाहीचा आरोप करतात. तुम्ही ग्रामीण भागात चांगले काम करीत असल्याचा प्रचार करता; पण १२ ग्रामपंचायती तुमच्याकडे असताना त्यातील चार ग्रामपंचायतींमध्ये आम्ही विजय मिळविला आहे. तर चार ग्रामपंचायतीत सत्तेमध्ये योग्य वाटा ठेवून पुढे जात आहोत. याचे विरोधकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा टोला त्यांनी लगावला.

ते म्हणाले, तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींमध्ये माहुली वगळता शिवसेनेची सत्ता होती. गेल्या वर्षभरापासून आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काम करत आहोत. त्याची परिणीती म्हणून भिकवडी बुद्रुक, मंगरूळ, शेडगेवाडी व पोसेवाडी या ग्रामपंचायती राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. तांदळगाव, देविखिंडी, मेंगाणवाडी व भडकेवाडी या चार ग्रामपंचायतीत स्थानिक कार्यकर्त्यांनी समन्वय साधून निवडणुका बिनविरोध केल्या आहेत. त्यामुळे या चारही ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सन्मानपूर्वक सत्तेत वाटा मिळेल.

चाैकट

सन्मानपूर्वक सत्तेत वाटा मिळणार

तांदळगाव, देविखिंडी, भडकेवाडी व मेंगाणवाडी या चार ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानपूर्वक सत्तेत वाटा मिळणार असल्याचेही ठासून सांगितले. पण सत्तेत वाटा किती आहे, यापेक्षा सर्वसामान्य जनतेसाठी चांगले काम करण्याचे धोरण माजी आ. सदाशिवराव पाटील यांनी ठेवल्यामुळेच आम्हाला ग्रामपंचायतीत यश मिळाले असल्याचेही वैभव पाटील म्हणाले.

फोटो - माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, विटा. यांचा फोटो वापरणे.

Web Title: Don't take the credit of unopposed Gram Panchayat alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.