लॉकडाऊनची अफवा पसरवून शेतीमालाचे दर पाडू नका : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 06:30 PM2021-02-24T18:30:36+5:302021-02-24T18:33:37+5:30

collector Sangli market- द्राक्ष, भाजीपाला उत्पादकांना लॉकडाऊनची खोटी भिती घालून व्यापाऱ्यांनी शेतमालांचे दर पाडू नयेत. अन्यथा लॉकडाऊन संदर्भात अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा गंभीर इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे.

Don't reduce the prices of agricultural commodities by spreading rumors of lockdown- Collector Dr. Abhijeet Chaudhary | लॉकडाऊनची अफवा पसरवून शेतीमालाचे दर पाडू नका : जिल्हाधिकारी

लॉकडाऊनची अफवा पसरवून शेतीमालाचे दर पाडू नका : जिल्हाधिकारी

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनची अफवा पसरवून शेतीमालाचे दर पाडू नका : जिल्हाधिकारी अफवा पसरवल्यास कारवाई होणार : डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : द्राक्ष, भाजीपाला उत्पादकांना लॉकडाऊनची खोटी भिती घालून व्यापाऱ्यांनी शेतमालांचे दर पाडू नयेत. अन्यथा लॉकडाऊन संदर्भात अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा गंभीर इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन होणार अशी भिती घालून द्राक्ष, भाजीपाला उत्पादक यांच्या मालाचे दर व्यापारी पाडत असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. परंतु, कोरोनामुळे लॉकडाऊन करण्याचे सद्यस्थितीत कोणतेही नियोजन नाही.

एकीकडे स्थानिक बाजारपेठेत द्राक्ष उत्पादनाला मागणी चांगली असली तरी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अपेक्षित दर मिळत नाही. कोरोनामुळे पुन्हा लॉकडाऊनची भिती घालून व्यापारी दर पाडत असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी हा इशारा दिला आहे. लॉकडाऊनची भिती घालून शेतकऱ्यांचे नुकसान कोणत्याही घटकाने करू नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 

Web Title: Don't reduce the prices of agricultural commodities by spreading rumors of lockdown- Collector Dr. Abhijeet Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.