दिव्यांग टीमने केले सर्वात उंच कळसुबाई शिखर सर, सांगलीतील ११ दिव्यांग सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 05:03 PM2021-01-07T17:03:15+5:302021-01-07T17:08:31+5:30

Divyang Sangli- दिव्यांग टीमने राज्यातील सर्वात उंच कळसुबाई शिखर सर करून एक आगळेवेगळे सहकार्याचे दर्शन घडवून आणले. राज्यातील ७० तर सांगली जिल्ह्यातील ११ दिव्यांग व्यक्तींनी हे शिखर सर केले.यामध्ये शिराळा येथील स्वाती भस्मे हिचा समावेश आहे.

Divyang team did the highest Kalsubai peak in the state Sir | दिव्यांग टीमने केले सर्वात उंच कळसुबाई शिखर सर, सांगलीतील ११ दिव्यांग सहभागी

दिव्यांग टीमने केले सर्वात उंच कळसुबाई शिखर सर, सांगलीतील ११ दिव्यांग सहभागी

Next
ठळक मुद्देदिव्यांग टीमने केले राज्यातील सर्वात उंच कळसुबाई शिखर सर शिराळा येथील स्वाती भस्मेसह सांगली जिल्ह्यातील ११ दिव्यांग व्यक्तींचा समावेश

विकास शहा

शिराळा : दिव्यांग टीमने राज्यातील सर्वात उंच कळसुबाई शिखर सर करून एक आगळेवेगळे सहकार्याचे दर्शन घडवून आणले. राज्यातील ७० तर सांगली जिल्ह्यातील ११ दिव्यांग व्यक्तींनी हे शिखर सर केले.यामध्ये शिराळा येथील स्वाती भस्मे हिचा समावेश आहे.

औरंगाबाद येथील शिवुर्जा प्रतिष्ठान मार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी आपलेतील सुप्तगुणांचे दर्शन घडविण्यासाठी गेल्या आठ वर्षांपासून वेगवेगळया संधी दिली जाते. यावेळी कळसुबाई शिखर चढण्यासाठी संधी दिली. यामध्ये राज्यातील २० जिल्ह्यातील १५० पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तींनी यामध्ये भाग घेतला.हे सर्व दिव्यांग कळसुबाई च्या पायथ्याशी असलेल्या जहागीरदार वाडी येथे एकत्र जमले.

दुपारी दोन च्या दरम्यान शिखर चढण्यास सुरुवात केली.कडाक्याची थंडी आणि जोरदार गार वारा याची तमा न बाळगता एकमेकाला आधार देत हे सर्वजण हळूहळू शिखर चढत होते. चार तास चालत चालत १६४७ मीटर उंचीचे हे शिखर ७० दिव्यांगानी सर केले. यामध्ये सांगली जिल्ह्यातील २० जणांनी सहभाग घेतला होता त्यापैकी ११ जणांनी हे शिखर सर केले.

सांगली टिम : सुदेश माने , स्वाती भस्मे , माधुरी पाटील, भगवा भंडारे , जारीना मणेर , मयुर ढेकळे , लता पाचांळ, अमर पवार, जयश्री शिंदे , अस्मिता पाटील

 

Web Title: Divyang team did the highest Kalsubai peak in the state Sir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.