मिरज रोडवरील महात्मा फुले स्मारकाची प्रचंड दुरवस्था; मनपाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 06:20 PM2021-04-09T18:20:23+5:302021-04-09T18:34:42+5:30

Muncipal Corporation Sangli- सांगली -मिरज रोडवरील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलसमोर असणारे राष्ट्रपिता जोतीबा फुले स्मारकाची प्रचंड दुरवस्था आहे. महानगरपालिका प्रशासनाने या स्मारकाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

The dilapidated condition of the Mahatma Phule monument on Miraj Road; Corporation neglect | मिरज रोडवरील महात्मा फुले स्मारकाची प्रचंड दुरवस्था; मनपाचे दुर्लक्ष

मिरज रोडवरील महात्मा फुले स्मारकाची प्रचंड दुरवस्था; मनपाचे दुर्लक्ष

googlenewsNext
ठळक मुद्देमिरज रोडवरील महात्मा फुले स्मारकाची प्रचंड दुरवस्थामहानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

सुरेंद्र दुपटे

संजय नगर /सांगली :सांगली -मिरज रोडवरील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलसमोर असणारे राष्ट्रपिता जोतीबा फुले स्मारकाची प्रचंड दुरवस्था आहे. महानगरपालिका प्रशासनाने या स्मारकाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. 

दि. ४ मे सन १९८४ रोजी मिरज नगरपरिषदने जोतीबा फुले स्मारक बांधले. १९९८ पासून महानगरपालिकेत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे. पण संबंधित राजकारण्यांनी  महापुरुषांचा त्यागाचा इतिहास पायदळी तुडवत या स्मारकाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

या महात्मा फुले स्मारकाची निगा राखली जात नाही. जवळील गटारी, खोदकामातील कचरा, घाण पाणी येथे आणून टाकून विटंबना होत आहे. यातून मनपा प्रशासनाचा चेहरा उघड झाला आहे.

यावेळी ऑल इंडिया पॅथर सेना, रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे  महासचिव अमोल वेटम, जिल्हा अध्यक्ष स्वप्नील खांडेकर यांनी दि. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीपूर्वी स्मारकाची स्वच्छता करावी अशी मागणी केली असून दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. याप्रकरणी  या महापुरुषांचा स्मारकाच्या विटंबना प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून आयुक्त, महापौर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महासचिव अमोल वेटम, जिल्हा अध्यक्ष स्वप्नील खांडेकर यांनी केली आहे. 

Web Title: The dilapidated condition of the Mahatma Phule monument on Miraj Road; Corporation neglect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.