सांगलीतील डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील लोखंडी जीना बदलण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 03:33 PM2021-03-20T15:33:10+5:302021-03-20T15:35:18+5:30

Muncipal Corporation Sangli- सांगलीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील लोखंडी जीना बदलून त्यात सुधारणा करा अशा मागणीचे निवेदन नागरिक जागृती मंचचेतर्फे सतीश साखळकर यांनी आयुक्त नितिन कापडणीस यांना दिले.

Demand for replacement of iron stairs in front of the statue of Dr. Ambedkar in Sangli | सांगलीतील डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील लोखंडी जीना बदलण्याची मागणी

सांगलीतील डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील लोखंडी जीना बदलण्याची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देसांगलीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील लोखंडी जीना बदलण्याची मागणी नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांचे आयुक्ताना निवेदन

संजयनगर/सांगली- सांगलीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील लोखंडी जीना बदलून त्यात सुधारणा करा अशा मागणीचे निवेदन नागरिक जागृती मंचचेतर्फे सतीश साखळकर यांनी आयुक्त नितिन कापडणीस यांना दिले.

सांगली शहरातील शास्त्री चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. या पुतळ्याकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेला जिना गेल्या दीड वर्षापासून गांजलेल्या अवस्थेत आहे. या संदर्भात येथील नागरिक जागृती मंचमार्फत पाठपुरावा करण्यात आला होता, मात्र कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने याकडे दुर्लक्ष झाले. या जिन्यावरून काही अपघातसुद्धा घडलेले आहेत.

या संदर्भात येथील नागरिक जागृती मंचमार्फत सतीश साखळकर यांनी आयुक्त नितिन कापडणीस यांच्याकडे हा जीना बदलण्याची मागणी केली आहे. १४ एप्रिल २०२१ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, तत्पूर्वी या ठिकाणचा लोखंडी जिना दीर्घकालीन टिकेल अश्या दर्जाचा तयार करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच जयंतीनिमित्त परिसरात अन्य सुधारणा करून स्वच्छता करण्यात यावी अशीही मागणी नागरिक जागृती मंचने आयुक्तांकडे केली आहे.

Web Title: Demand for replacement of iron stairs in front of the statue of Dr. Ambedkar in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.