चोपडेवाडीत महिलेवर मगरीचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 01:04 PM2021-05-07T13:04:15+5:302021-05-07T13:06:14+5:30

wildlife sangli : चोपडेवाडी (ता.पलूस) येथे मगरीने केलेल्या हल्ल्यात नम्रता मारुती मोरे (वय ३१) ही महिला जखमी झाली. प्रसांगवधान दाखाविल्याने ती मगरीच्या तावडीतून सहिसलामत बचावली.

Crocodile attack on Chopdewadi woman | चोपडेवाडीत महिलेवर मगरीचा हल्ला

चोपडेवाडीत महिलेवर मगरीचा हल्ला

Next
ठळक मुद्देचोपडेवाडीत महिलेवर मगरीचा हल्ला मगरीचा बंदोबस्त करावा अशी वनविभागाकडे मागणी

भिलवडी : चोपडेवाडी (ता.पलूस) येथे मगरीने केलेल्या हल्ल्यात नम्रता मारुती मोरे (वय ३१) ही महिला जखमी झाली. प्रसांगवधान दाखाविल्याने ती मगरीच्या तावडीतून सहिसलामत बचावली.

चोपदेवाडी येथील कृष्णा नदी काठावर असणाऱ्या गावपाणवठ्यावर नम्रता मोरे यांच्यासह दोन महिला धुणे धुत होत्या.पाठीमागून पाण्यातून आलेल्या मगरीने त्यांच्यावर हल्ला केला. मगरीने त्यांच्या उजव्या दंडाला जबड्यात पकडून पाण्यात खेचायला सुरूवात केली.नम्रता यांनी आरडाओरडा करीत हाताला जोराने हिसडा मारला.यामुळे मगरीने जबडा उघडला.

मगरीच्या तोंडातून हात सुटल्याने नम्रता पाणवठ्यावर पळत आल्या. सावधगिरी व धाडसामुळे मगरीच्या तावडीतून त्यांचा जीव वाचला. मगरीचे दात दंडात घुसल्याने त्यांच्या हाताला दुखापत होऊन त्या किरकोळ जखमी झाल्या. नागरिकांनी त्यांना तातडीने भिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.

या वर्षात मगरीने प्रथमच कृष्णा नदी काठावरील लोकांची वर्दळ असणाऱ्या पाणवाठयावर महिलेवर हल्ला केला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

Web Title: Crocodile attack on Chopdewadi woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.