CoronaVirus : शेटफळेतील जेष्ठ नागरिकाची कोरोनाच्या भीतीने आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 10:43 AM2020-06-06T10:43:16+5:302020-06-06T10:50:37+5:30

आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील दिगंबर कृष्णा खांडेकर (वय ६८)  यांनी गळफास घेऊन शुक्रवारी रात्री आत्महत्या केली. कोरोनाग्रस्त कुटूंब च्या घराशेजारी राहत आसल्याने त्यांनी भीती पोटी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. 

CoronaVirus: A senior citizen of Shetfal commits suicide due to fear of corona | CoronaVirus : शेटफळेतील जेष्ठ नागरिकाची कोरोनाच्या भीतीने आत्महत्या

CoronaVirus : शेटफळेतील जेष्ठ नागरिकाची कोरोनाच्या भीतीने आत्महत्या

Next
ठळक मुद्देशेटफळेतील जेष्ठ नागरिकाची कोरोनाच्या भीतीने आत्महत्याकोरोनाग्रस्त कुटूंबाच्या शेजारीच राहत होते

करगणी (सांगली) : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील दिगंबर कृष्णा खांडेकर (वय ६८)  यांनी गळफास घेऊन शुक्रवारी रात्री आत्महत्या केली. कोरोनाग्रस्त कुटूंब च्या घराशेजारी राहत आसल्याने त्यांनी भीती पोटी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. 

शेटफळेतील एसटी चालकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गावात कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आला होता. यातच त्याची दोन मुलेही कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शेटफळेत भीतीचे वातावरण निर्माण झाले. याशिवाय घरातून बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली. दिगंबर खांडेकर याचे घर कोरोनाग्रस्त कुटूंबाच्या शेजारीच आहे.

दोन दिवसांपूर्वी दिगंबर खांडेकर यांनी गावातील आरोग्यसेवकाला मला भीती वाटत असून थोडा ताप येत असल्याचे सांगितले होते.यावेळी आरोग्य सेवक यांनी ताप तपासला आता तो साधारण होता. त्यामुळे त्यांनी काही गोळ्या देत काळजी करू नका, तुम्ही व्यवस्थित आहात असे सांगितले होते.

मात्र ते दोन दिवसांपासून भीतीच्या छायेखाली होते. दरम्यान शुक्रवारी रात्री त्यांनी राहत्या घराच्या जनावरांच्या गोट्याशेजारी असणाऱ्या काटेरी झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. दरम्यान, याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण नमूद करण्यात आले नाही.

Web Title: CoronaVirus: A senior citizen of Shetfal commits suicide due to fear of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.