आष्टा पालिकेचे स्वच्छता कर्मचारी ठरले कोरोना योद्धे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:20 AM2021-06-25T04:20:30+5:302021-06-25T04:20:30+5:30

फोटो : आष्टा शहरात पालिकेचे कर्मचारी कोरोना रुग्ण आढळलेल्या भागात औषध फवारणी करत आहेत. सुरेंद्र शिराळकर लोकमत न्यूज नेटवर्क ...

Corona Warriors became the cleaning staff of Ashta Municipality | आष्टा पालिकेचे स्वच्छता कर्मचारी ठरले कोरोना योद्धे

आष्टा पालिकेचे स्वच्छता कर्मचारी ठरले कोरोना योद्धे

Next

फोटो : आष्टा शहरात पालिकेचे कर्मचारी कोरोना रुग्ण आढळलेल्या भागात औषध फवारणी करत आहेत.

सुरेंद्र शिराळकर

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : आष्टा शहरात सुमारे एक हजार कोरोना रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेबरोबर या वर्षात सुमारे ६५ कोरोना मृतांवर गॅस दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार केले आहेत. यामुळे हे कर्मचारी खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे ठरले आहेत.

आष्टा शहरातील विविध भागात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्याठिकाणी जंतूनाशक औषध फवारणीबरोबरच कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कार करण्याचे काम कर्मचारी करत आहेत.

आष्टा मर्दवाडी मार्गावर अमरधाम स्मशानभूमी येथे पालिकेकडून गॅस दाहिनी उभारण्यात आली आहे. याठिकाणी कर्मचारी पीपीई किट घालून मृतांवर अंत्यसंस्कार करत आहेत. दिवस वा रात्र याची तमा न बाळगता माहिती मिळताच पालिकेचे कर्मचारी आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत आहेत.

मुख्याधिकारी डाॅ. कैलास चव्हाण, आरोग्य अधिकारी आर. एन. कांबळे यांच्यासह पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लखन लोंढे, योगेश कांबळे, पांडुरंग पेटारे, सुखदेव टोमके, संजय भंडारे, अरुण टोमके हे शहरात औषध फवारणीबरोबर गॅस दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करत आहेत. हे कर्मचारी खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे ठरले आहेत.

Web Title: Corona Warriors became the cleaning staff of Ashta Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.