corona virus : कोरोनाचा परिणाम : ग्रीन टीची देशांतर्गत मागणी दुपटीने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 05:26 PM2021-01-06T17:26:05+5:302021-01-06T17:28:54+5:30

corona virus Health Tea Sangli- कोरोनाकाळात आरोग्याबाबत वाढलेली सतर्कता चहाच्या नव्या संस्कृतीला जन्म देत आहे. त्यामुळे पारंपरिक चहापेक्षा ग्रीन टीच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. काही चहा उत्पादकांना मागणीत चौपट वाढ झाल्याचाही अनुभव येत आहे. येत्या काही महिन्यात यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

corona virus: Corona effect: Domestic demand for green tea doubles | corona virus : कोरोनाचा परिणाम : ग्रीन टीची देशांतर्गत मागणी दुपटीने वाढली

corona virus : कोरोनाचा परिणाम : ग्रीन टीची देशांतर्गत मागणी दुपटीने वाढली

Next
ठळक मुद्देकोरोनाचा परिणाम : ग्रीन टीची देशांतर्गत मागणी दुपटीने वाढलीइम्युनिटी बुस्टर म्हणून वापर वाढला, उत्पादन वाढण्याची चिन्हे

अविनाश कोळी

सांगली : कोरोनाकाळात आरोग्याबाबत वाढलेली सतर्कता चहाच्या नव्या संस्कृतीला जन्म देत आहे. त्यामुळे पारंपरिक चहापेक्षा ग्रीन टीच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. काही चहा उत्पादकांना मागणीत चौपट वाढ झाल्याचाही अनुभव येत आहे. येत्या काही महिन्यात यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

ग्रीन टीचे देशांतर्गत वार्षिक उत्पादन २० ते २५ मिलियन किलो (२ ते अडीच लाख टन) इतके आहे. देशातील एकूण सर्व प्रकारच्या चहाचे उत्पादन १३०० मिलियन किलोच्या घरात आहे. एकूण चहा उत्पादनात ग्रीन टीचे उत्पादन १.५ ते २ टक्के इतके आहे.

देशांतर्गत ग्रीन टीची मागणी कोरोनापूर्वी कमी होती. ती आता काही ठिकाणी दुप्पट, तर काही ठिकाणी चौपट झाली. इम्युनिटी बुस्टर (रोगप्रतिकारक पेय) म्हणून ग्रीन टीचा वापर वाढला आहे. मार्च ते नोव्हेंबर या काळात चहाची नवी ग्रीन संस्कृती वाढत असल्याने मागणीतही तितकीच वाढ झाली आहे.

जगातील एकूण ग्रीन टी उत्पादनात सर्वाधिक म्हणजेच ५० ते ८० टक्के उत्पादन चीनमध्ये होते. पारंपरिक दूध व साखरेचा वापर करून पिल्या जाणाऱ्या सीटीसी चहाचे भारतातील उत्पादन हे ९० टक्के इतके आहे. मागणी वाढल्याने ग्रीन टीच्या उत्पादनात आता वाढ होण्याचा अंदाज आहे.

दरात वाढ होतेय

मागणी वाढताना उत्पादन घटल्याने चहाच्या दरात वाढ झाली आहे. उच्च दर्जाच्या चहाचा दर सध्या ३०० ते ३२५ रुपये किलो, मध्यम दर्जाच्या चहाचा दर २२५ ते २५० रुपये, तर दक्षिण भारतातील चहाचा दर १३० ते १५० रुपये किलो आहे. कोरोनापूर्वीच्या दराशी तुलना करता, ३० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे. पूर्वी २५० रुपये किलो असलेल्या ग्रीन टीचा दर आता ४०० रुपयांवर गेला आहे.

चहा उद्योजक व फेडरेशन ऑफ ऑल इंडिया टी ट्रेडर्स असोसिएशन (फेटा) चे सदस्य राजेश शहा यांनी सांगितले कि, कोरोना काळात आरोग्यदायी पेय म्हणून ग्रीन टीची मागणी अनपेक्षितरित्या वाढली आहे. आमच्याकडे ग्रीन टीच्या मागणीत जवळपास ४०० टक्के वाढ दिसत आहे. देशात सरासरी दुपटीपेक्षा अधिक मागणी वाढली आहे.

Web Title: corona virus: Corona effect: Domestic demand for green tea doubles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.