शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

‘जीएसटी’ प्रणालीमुळे व्यवहारात सुसूत्रता : एस. ए. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:23 IST

यापूर्वी करदात्यांना तीन वेगवेगळ्या विभागाकडे कर भरण्यासाठी जावे लागत होते

ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेत आयकर भरण्यात वाढ; आठ महिन्यात करदातेही वाढले

यापूर्वी करदात्यांना तीन वेगवेगळ्या विभागाकडे कर भरण्यासाठी जावे लागत होते. मात्र जीएसटी आल्यानंतर वेगवेगळे करभरणा, विवरणपत्र, करनिर्धारण, लेखापरीक्षण तसेच वेगवेगळ्या विभागाचा त्रास कमी झाला आहे. भविष्यात सर्व व्यवहार सुरळीत होतील. जीएसटी करप्रणाली निश्चितपणे चांगली आहे. यासंदर्भात सांगलीतील कर सल्लागार एस. ए. पाटील यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...प्रश्न : जीएसटी लागू झाल्यानंतर या आठ ते नऊ महिन्यांमध्ये कर भरण्यामध्ये काय फरक पडला?उत्तर : व्यापार वाढीसाठी व योग्यप्रकारे नियोजन, पारदर्शकता, संगणकीकरण, भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी ‘एक देश, एक कर’ कायद्याची आवश्यकता होतीच. या करप्रणालीमुळे व्यवहारात सुसूत्रता आली आहे. संगणकीकरणामुळे मानवी हस्तक्षेप कमी झाला आहे. यातून भ्रष्टाचाराला आळा बसेल. जीएसटी खरोखरच काळाची गरज आहे. दि. १ एप्रिल २0१८ पासून ई-वे बिल कर प्रणाली आंतरराज्य व्यवहारासाठी बंधनकारक करण्यात आलेली आहे. त्यामुळे कर चुकवेगिरीला मोठ्या प्रमाणात आळा बसण्याची शक्यता आहे. परंतु त्यासाठी संगणकाच्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या पाहिजेत, तरच व्यापाऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही. जीएसटी लागू झाल्यानंतर या आठ ते नऊ महिन्यांमध्ये कर भरणा व करदात्यांमध्ये वाढ झाली आहे. जीएसटी दरामध्ये सुरुवातीला मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे लोकांना त्याचा त्रास झाला. लहान-मोठ्या व्यापारांना दरमहा जीएसटीआर रिटर्न भरावे लागत आहे. सरकारने लहान-मोठ्या व्यापाºयांचे वर्गीकरण न करता सर्वांना दरमहा जीएसटीआर भरणे आवश्यक आहे. लहान-मोठ्या व्यापाºयांच्या वर्गीकरणांची दक्षता सरकारने घेतली असती, तर लहान व्यापाºयांना दरमहाऐवजी तिमाही कर भरता आला असता. त्यामुळे संगणक प्रणालीवर अनावश्यक भार पडला नसता.प्रश्न : जीएसटी कर प्रणालीत कोणत्या त्रुटी आढळून आल्या? त्याचा काय परिणाम झाला?उत्तर : जीएसटी करप्रणालीत सुरुवातीला बºयाच तांत्रिक त्रुटी आढळून आल्याने करदात्यांना उशिरा शुल्क भरावे लागल्याने खूप त्रास झाला. शासनाला उशिरा का होईना जाग आली. शासनाने सुधारणा करून पहिल्या तीन महिन्याचे उशिरा शुल्क माफ केले. पुढील महिन्यासाठी उशिरा शुल्क कमी केले. सुरुवातीला प्रतिदिवस तीनशे रुपये उशिरा शुल्क होते, सध्या प्रतिदिवस पन्नास रुपये उशिरा शुल्क आकारले जात आहे.प्रश्न : कर विभाग, कर सल्लागार आणि ग्राहक सर्वजण सध्या संभ्रमावस्थेत दिसतात. हा संभ्रम दूर होणार का? आणि कधी होणार?उत्तर : सध्या कर विभाग व कर सल्लागार यांच्यातील संभ्रम बºयाचअंशी कमी झाला आहे. फक्त ग्राहकांमध्ये संभ्रम जाणवतो. हळूहळू जीएसटी कायदा सर्वांना सोपा असल्याचे जाणवत जाईल. त्यानंतर हा संभ्रम आपोआप दूर होईल.प्रश्न : एकूणच करप्रणालीत सुलभता आली आहे का? मार्चअखेरीस आयकर प्रणालीत काय फरक जाणवतो?उत्तर : निश्चितच नव्या करप्रणालीमुळे ग्राहकांमध्ये काही प्रमाणात द्विधा मन:स्थिती सुरुवातीच्या काळात होती. मात्र आता ग्राहकांनाही प्रणाली समजली आहे. एकूणच कर प्रणालीत सुलभता आली आहे. जीएसटी करदात्यांमध्ये वाढ झाल्याने आयकर प्रणालीद्वारे गतवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात आयकर भरण्यामध्ये वाढ होत आहे.- सचिन लाड, सांगली

टॅग्स :SangliसांगलीGSTजीएसटी