‘क्रांती’कडून एफआरपीची सर्व रक्कम जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:29 IST2021-09-21T04:29:33+5:302021-09-21T04:29:33+5:30

ते म्हणाले की, कारखान्याची एफआरपी २९८४ रुपये होती. याआधी २८९४ रुपयेप्रमाणे २५५ कोटी ८३ लाख १३ हजार ९८१ रुपये ...

Collect all FRP amount from ‘Kranti’ | ‘क्रांती’कडून एफआरपीची सर्व रक्कम जमा

‘क्रांती’कडून एफआरपीची सर्व रक्कम जमा

ते म्हणाले की, कारखान्याची एफआरपी २९८४ रुपये होती. याआधी २८९४ रुपयेप्रमाणे २५५ कोटी ८३ लाख १३ हजार ९८१ रुपये यापूर्वी दिले आहेत. उर्वरित ९० रुपयेप्रमाणे ७ कोटी ९५ लाख ६० हजार ४४७ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. एकूण २९८४ रुपये प्रमाणे २६३ कोटी ७८ लाख ७४ हजार ४२८ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर आजअखेर वर्ग करण्यात आले आहेत.

आमदार लाड म्हणाले की, शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आणि सणासुदीच्या काळातील पैशाची निकडीची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, कारखान्याचे उपाध्यक्ष अनंत जोशी, कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे उपस्थित होते.

Web Title: Collect all FRP amount from ‘Kranti’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.