शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बंद ‘लेसर शो’चा दणक्यात वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 01:04 IST

सांगली : जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून मंजूर ५० लाख रुपये खर्च करून महापालिकेने कृष्णाकाठावरील वसंतदादा स्मारकाजवळ वर्षभरापूर्वी लेसर शो प्रकल्प उभारला होता. त्याचे उद््घाटनही दणक्यात करण्यात आले होते. पण उद््घाटनानंतर हा लेसर शो गायबच आहे. लेसर शोच्या वर्षपूर्तीचे निमित्त साधत स्वाभिमानी विकास आघाडीने या शोच्या स्थळी पाच किलोचा केक ...

सांगली : जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून मंजूर ५० लाख रुपये खर्च करून महापालिकेने कृष्णाकाठावरील वसंतदादा स्मारकाजवळ वर्षभरापूर्वी लेसर शो प्रकल्प उभारला होता. त्याचे उद््घाटनही दणक्यात करण्यात आले होते. पण उद््घाटनानंतर हा लेसर शो गायबच आहे. लेसर शोच्या वर्षपूर्तीचे निमित्त साधत स्वाभिमानी विकास आघाडीने या शोच्या स्थळी पाच किलोचा केक कापून सोमवारी सायंकाळी अनोखे आंदोलन केले.यावेळी स्वाभिमानीचे नगरसेवक गौतम पवार, सतीश साखळकर, बलदेव गवळी, विशाल पवार, अनिकेत खिलारे, अविनाश चौगुले, शेरसिंग ढिल्लो, प्रदीप कांबळे, आनंद देसाई, बुधवंत निंबाळकर, उमेश देशमुख, सलमान खान, हेमंत शिंदे, चंद्रकांत काळे, मोहन चोरमुले, रियाझ जमादार, फझल कापूरवाले, प्रशांत भोसले आदी उपस्थित होते.यासंदर्भात साखळकर, पवार म्हणाले, एकीकडे शहर खड्ड्यांत असताना, महापालिकेने वसंतदादा स्मारकाच्या ठिकाणी ५० लाख रुपये खर्चून कारंजा आणि लेसर शोचा प्रकल्प घेतला. परंतु खाबूगिरीला चटावलेल्या कारभाºयांनी हा लेसर शोचा फार्सच केला. लेसर शोवर सांगली शहराचा, जिल्ह्याचा इतिहास दाखवू, तेथे पर्यटनस्थळ करू, असाही डांगोरा पिटला. पण उद््घाटनानंतर प्रत्यक्षात वर्षभरात एकदाही लेसर शो झाला नाही. शासनाच्या निधीची उधळपट्टी कशाप्रकारे केली जाते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. याचा आम्ही केक कापून निषेध केला.गौतम पवार म्हणाले, शहरातील मूलभूत समस्या तशाच असताना, निव्वळ लुटीसाठीच हा धंदा मांडण्यात आला. लेसर शोवर उधळपट्टी केली. पाण्याच्या चार पाईप लावून शेड उभारण्यात आले. परंतु उसन्या मोटारी आणि लेसर दिवेही उद्घाटनासाठी बसविले. परंतु चार दिवसांत पुन्हा ते तेथून काढून नेण्यात आले. त्यावेळीही आम्ही तक्रार केली, पण दखल घेतली नाही. आता वर्ष झाले तरी लेसर शोही नाही आणि सांगलीचा इतिहासही नाही. एकूणच हा ५० लाखांचा घोटाळा आहे. याप्रकरणी आयुक्तांनी चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू.

टॅग्स :Strikeसंप