विटा परिसरात अवैध दारूविक्रीवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:20 AM2021-06-25T04:20:34+5:302021-06-25T04:20:34+5:30

सांगली : अवैधरीत्या दारूची विक्री करणाऱ्यांवर पाेलिसांकडून कारवाई सुरू आहे. विटा पोलिसांनी केलेल्या कारवाईत १८० मि.लि.च्या २४ बाटल्या दारू ...

Action on illegal sale of liquor in Vita area | विटा परिसरात अवैध दारूविक्रीवर कारवाई

विटा परिसरात अवैध दारूविक्रीवर कारवाई

googlenewsNext

सांगली : अवैधरीत्या दारूची विक्री करणाऱ्यांवर पाेलिसांकडून कारवाई सुरू आहे. विटा पोलिसांनी केलेल्या कारवाईत १८० मि.लि.च्या २४ बाटल्या दारू जप्त करत संशयितावर गुन्हा दाखल केला. यापुढेही जिल्हाभर पोलिसांकडून कारवाई सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

----

फी वसुलीची सक्ती न करण्याची मागणी

सांगली : गेल्यावर्षी कोरोनामुळे अनेक अडचणी असतानाही अनेक शाळांकडून गेल्यावर्षीची फी भरण्याविषयी पालकांना संदेश पाठवले जात आहेत. गेल्यावर्षी शिक्षणातही अडचणी असल्याने गेल्यावर्षीची फी वसुली करताना सक्ती करण्यात येऊ नये, अशी मागणी पालकांतून होत आहे. शाळांचे कामकाज नियमित सुरू होईपर्यंत फीसाठी सक्ती करू नये, अशी मागणी होत आहे.

----

चिन्मय पार्क मार्गावरील पथदिवे सुरू करण्याची मागणी

सांगली : शहरातील लक्ष्मी मंदिर चौक ते चिन्मय पार्करोडवर असलेल्या पथदिव्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी खांब उभे करण्यात आले तरीही अद्याप त्यावर दिवे लावण्यात आलेले नाहीत तरी दिवे लावून पथदिवे सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

----

पोलिसांकडून कडक तपासणी

सांगली : महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लागू करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे आता पोलिसांनीही कडक तपासणी सुरू केली आहे. गुरुवारी दुपारपासूनच प्रमुख चौकात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत होती.

-------

होमआयसोलेशनमधील रुग्णसंख्येत वाढ

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्यामुळे होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सध्या सहा हजार ९३० रुग्ण होमआयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.

Web Title: Action on illegal sale of liquor in Vita area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.