Corona vaccine-ऑन लाईन नोंदणी करूनही लस घेण्यासाठी मात्र गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 12:00 PM2021-05-12T12:00:03+5:302021-05-12T12:05:31+5:30

Corona vaccine Sangli : जिल्ह्याबाहेरील काही लोक ऑनलाइन  नोंद करूनही लसीकरणासाठी उपस्थित राहत नाहीत. खोडसाळपणा करणाऱ्या या लोकांची यादी देऊन  संबधित ग्रामीण रुग्णालयाजवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी कडेगाव  तालुक्यातील नागरिकांतून होत आहे. 

Absent to get vaccinated even after online registration | Corona vaccine-ऑन लाईन नोंदणी करूनही लस घेण्यासाठी मात्र गैरहजर

Corona vaccine-ऑन लाईन नोंदणी करूनही लस घेण्यासाठी मात्र गैरहजर

googlenewsNext
ठळक मुद्देऑन लाईन नोंदणी करूनही लस घेण्यासाठी मात्र गैरहजरऑनलाईन खोडसाळणा करणाऱ्यावर कारवाईची गरज  : गरजूंचीही घालवितात संधी 

 प्रताप महाडीक

कडेगाव : राज्यात १८ ते ४५  वयोगटातील व्यक्तींना कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला. मात्र जिल्ह्याबाहेरील काही लोक ऑनलाइन  नोंद करूनही लसीकरणासाठी उपस्थित राहत नाहीत. या लोकांना ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर फोन करून  बोलवून घेत आहेत तरीही फोन न उचलणे, उलट-सुलट बोलणे असे प्रकार घडत आहेत. हे प्रकार सर्वत्र घडत आहेत. यामुळे आपत्तीच्या काळातही 
खोडसाळपणा करणाऱ्या या  लोकांची यादी देऊन  संबधित ग्रामीण रुग्णालयाजवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी कडेगाव  तालुक्यातील नागरिकांतून होत आहे. 

वास्तविक ऑन लाईन नोंदणीसाठी अनेक अडथळे निर्माण होत असल्यामुळे  ग्रामीण भागातील लोकांची डोकेदुखी होत आहे.दररोज रात्री ८ नंतर लसीकरणासाठी दिलेल्या लिंकवरून पुढील दिवसाची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. मात्र काही सेकंदात संबधीत रुग्णालयांमध्ये उपलब्ध लसीच्या संख्येइतक्या लोकांची नोंद होते.यामुळे  मोबाईल रेंज अभावी तसेच सर्व तांत्रिक  बाबींची माहिती नसल्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांशी लोकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होत नाही.या काळात  रुग्णालयापासून दूरवरच्या अंतरावरील कित्येक लोक नोंदणी प्रक्रिया पूर्ण करतात.

सर्वानाच लस घेण्याचा आणि आपल्याला हवे त्या रुग्णालयाची निवड करण्याचा आणि अगदी वेळेची निवड करण्याचाही  
हक्क आहे .मात्र नोंदणी केलीच आहे तर संबंधित लोकांनी लसीकरणासाठी उपस्थित राहण्याची गरज आहे.संबधित लोकांच्या खोडसाळपणामूळे व विकृत वर्तनामुळे रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रातील गरजू लोकांना लस मिळत नाही.यावर राज्यस्तरावर ठोस निर्णय घेऊन संबंधितांवर कारवाई केल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत.

.... त्या लसींचा साठा रुग्णालयात शिल्लक 

लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करूनही लस घेण्यासाठी  गैरहजर राहत असलेल्या लोकांची संख्या सरासरी १० टक्के आहे.असे रुग्णालयांमध्ये  माहिती घेतली असता समजले.संबधित लोकांसाठी उपलब्ध असलेल्या लसींचा साठा रुग्णालयांमध्ये शिल्लक आहे. या शिल्लक असलेल्या लसीची नोंद  ठेऊन ऑफलाइन पद्धतीने देण्याची परवानगी संबधित रुग्णालयांना द्यावी अशी अपेक्षा स्थानिक गरजू नागरिक व्यक्त करित आहेत.

Web Title: Absent to get vaccinated even after online registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.