आटपाडी तालुक्यात 9.3 मि. मी. पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 06:54 PM2020-09-26T18:54:29+5:302020-09-26T18:55:45+5:30

सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 3.77 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आटपाडी तालुक्यात सर्वाधिक 9.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

9.3 min in Atpadi taluka. I Rainfall record | आटपाडी तालुक्यात 9.3 मि. मी. पावसाची नोंद

आटपाडी तालुक्यात 9.3 मि. मी. पावसाची नोंद

googlenewsNext
ठळक मुद्देआटपाडी तालुक्यात 9.3 मि. मी. पावसाची नोंदवारणा धरणात 34.40 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली: जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 3.77 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आटपाडी तालुक्यात सर्वाधिक 9.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 4 (553.1), तासगाव 9.1 (496.1), कवठेमहांकाळ 3.6 (551.2), वाळवा-इस्लामपूर 2 (623), शिराळा 1.8 (1309.3), कडेगाव 0.2 (568.8), पलूस 1.5 (475.1), खानापूर-विटा 2.4 (718.4), आटपाडी 9.3 (666), जत 5.8 (374.8).

वारणा धरणात 34.40 टी.एम.सी. पाणीसाठा

 जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.40 टी.एम.सी. पाणीसाठा असून हे धरण 100 टक्के भरले असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. तसेच कोयना, दुधगंगा, तुळशी, पाटगाव, अलमट्टी व तारळी ही धरणे सुध्दा 100 टक्के भरली आहेत.

धोम धरणात 13.25 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कण्हेर धरणात 9.98 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 9.89 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, राधानगरी धरणात 8.24 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी. आहे.

सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे.

कोयना 9274, धोम 70, कण्हेर 24, वारणा 1267, दूधगंगा 1200, राधानगरी 1000, कासारी 250 व पाटगाव धरणातून 369 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 5.9 (45), आयर्विन पूल सांगली 9 (40) व अंकली पूल हरिपूर 11.6 (45.11).

Web Title: 9.3 min in Atpadi taluka. I Rainfall record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.