सांगली जिल्ह्यात 68 हजार कुटुंबाना 34 कोटी अनुदान वितरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 03:21 PM2019-08-26T15:21:27+5:302019-08-26T15:23:25+5:30

सांगली जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या अभूतपूर्व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार या प्रमाणे 24 ऑगस्ट अखेर 68 हजार 480 कुटुंबाना 34 कोटी 24 लाख सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे.

34 crore subsidy was distributed to 68 thousand families in Sangli district | सांगली जिल्ह्यात 68 हजार कुटुंबाना 34 कोटी अनुदान वितरीत

सांगली जिल्ह्यात 68 हजार कुटुंबाना 34 कोटी अनुदान वितरीत

Next
ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात 68 हजार कुटुंबाना 34 कोटी अनुदान वितरीतपूरबाधित 57 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप

सांगली : जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या अभूतपूर्व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार या प्रमाणे 24 ऑगस्ट अखेर 68 हजार 480 कुटुंबाना 34 कोटी 24 लाख सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे.

पुरबाधित कुटुंबांना तातडीची मदत म्हणून प्रत्येक कुटूंबास 5 हजार रूपये रोख रक्कम देण्यात येत असून उर्वरित रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

जिल्ह्यातील 104 गावातील ग्रामीण भागातील 45 हजार 195 कुटूंबे व शहरी भागातील 42 हजार 646 कुटूंबे बाधित झाली होती. त्यापैकी ग्रामीण भागातील 41 हजार 854 व शहरी भागातील 26 हजार 626 कुटूंबांना 5 हजार रूपये या प्रमाणे रोखीने रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील 6 हजार 493 कुटुंबाना 5 हजार रूपये वजा जाता उर्वरित 3 कोटी 24 लाख 65 हजार रूपयांची रक्कम धनादेशाव्दारे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित पंचनामे व अनुदान वाटप सुरू आहे.

पूरबाधित सर्व गावांमध्ये वाटप करण्यात येत असून त्याकामी मदत वाटपाचे काम सर्व गावात युध्दपातळीवर सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील कर्मचाऱ्यासह इतर तालुक्यातून व जिल्ह्यातूनही अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.

पूरबाधित 57 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप

सांगली शहरासह जिल्ह्यातील पलूस, वाळवा, मिरज व शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने पुरामुळे सुमारे 104 गावे बाधित झाली. मदत व पुनर्वसनासाठी पूरपश्चात उपाययोजना अत्यंत गतीने सुरू आहेत. 24 ऑगस्ट अखेर 57 हजार 761 कुटुंबांना एकूण 5776.1 क्विंटल गहू व 5776.1 क्विंटल तांदूळ मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरीत पूरबाधितांना मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच एकूण 36 हजार 634 इतक्या बाधित कुटूबांना 5 लिटर प्रमाणे 1 लाख 83 हजार 170 लिटर केरोसीन वाटप करण्यात आले आहे.

नुकसानग्रस्त 65.60 टक्के पीक क्षेत्राचा पंचनामा

 पुरामुळे जिल्ह्यातील एकूण 249 गावांतील नजरअंदाजे 66098.50 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यापैकी 43360.47 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा करण्यात आला आहे. ही टक्केवारी 65.60 टक्के असून उर्वरित क्षेत्राचा पंचनामा गतीने सुरू आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

पुरामुळे बाधित पीक क्षेत्राच्या गावांची संख्या 249 असून यातील 1 लाख 20 हजार 231 बाधित शेतकऱ्यांचे 66098.50 हेक्टर क्षेत्र बाधित आहे. यापैकी 86 हजार 201 शेतकऱ्यांच्या 43360.47 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा झाला आहे.

यामध्ये मिरज तालुक्यातील 27 गावातील 29 हजार 242 बाधित शेतकऱ्यांचे 14 हजार 838 हेक्टर क्षेत्र बाधित असून 16 हजार 285 शेतकऱ्यांच्या 11789.24 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा झाला आहे. वाळवा तालुक्यातील 44 गावातील 33 हजार 290 बाधित शेतकऱ्यांचे 16 हजार 190 हेक्टर क्षेत्र बाधित असून 23 हजार 396 शेतकऱ्यांच्या 12161.94 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा झाला आहे.

शिराळा तालुक्यातील 95 गावातील 36 हजार 250 बाधित शेतकऱ्यांचे 19 हजार 636 हेक्टर क्षेत्र बाधित असून 24 हजार 291 शेतकऱ्यांच्या 8675.66 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा झाला आहे. पूलस तालुक्यातील 31 गावातील 19 हजार 240 बाधित शेतकऱ्यांचे 14 हजार 680 हेक्टर क्षेत्र बाधित असून 16 हजार 430 शेतकऱ्यांच्या 9647.38 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा झाला आहे.

तासगाव तालुक्यातील 4 गावातील 994 बाधित शेतकऱ्यांचे 483 हेक्टर क्षेत्र बाधित असून 661 शेतकऱ्यांच्या 441.41 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा झाला असून कडेगाव तालुक्यातील 2 हजार 138 शेतकऱ्यांच्या 644.84 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा झाला आहे.

पूरबाधितांना जीवनोपयोगी वस्तुंचे  वाटप
 

पूरबाधित लोकांना जीवनोपयोगी साहित्याचे वितरण प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. दिनांक 24 ऑगस्ट पर्यंत 10 हजार 59 बिस्कीट पाकीटे, 71 हजार 702 पिण्याचे पाणी बॉक्स, 469 किलो दूध पावडर पाकिटे, 194 डझन मेणबत्या, 43 हजार 441 भोजन पाकिटे, 38 हजार 871 किलो रवा, साखर, आदि अन्नधान्याचे वाटप, 13 हजार 960 जीवनोपयोगी वस्तुंचे किट, 10 हजार 152 भांड्यांचे किट यांचे वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.

सांगली येथील प्राप्त जनरल औषधे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत पूरग्रस्तांना देण्यात येत आहेत. तसेच जनावरांची औषधे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत पूरग्रस्तांना देण्यात येत आहेत. तहसिलदार कार्यालय मिरज, पलूस व वाळवा येथे प्राप्त जनरल औषधे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत पूरग्रस्तांना देण्यात येत आहेत.
 

Web Title: 34 crore subsidy was distributed to 68 thousand families in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.